सोलापूर – रेल्वे प्रवासी संघटना व अ.भा.असघटीत रेल्वे कर्मचारी तर्फे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्टेशन मास्तर श्रीवास्तव, डिव्हीजन्ल चीप ईनीस्पेक्टर यशवंत फडतरे,बार्टी-समाज कल्याण प्रकल्प अधिकारी गायकवाड, सिध्देश्वर महाराज, ट्रेन मंनेजर, पुरूषोत्तम तलवारी यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
संघटनेचे अध्यक्ष राजा जाधव यांनी सांगितले की, भारताचे संविधान म्हणजे केवळ त्यातील शब्द नव्हेत तर त्या देशातील व्यक्ती केंद्रस्थानी मानून स्वातंत्र्य आणि समतेचा असं धरणारा एक जिवंत दस्तऐवज आहे.व धर्म निरपेक्षता हां संविधानाचा गुणधर्म, संविधान जगण्याचा मार्ग आहे
यावेळी सुत्र संचालन विश्वास गायकवाड यांनी केलं तर निता सोनवणे यांनी संविधानाचे प्रस्ताविकेचे वाचन केले. आभार प्रदर्शन गौतम कांबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम अस्लम शेख, निवृत्त टि.टी.विश्वनाथ चलवादी, पायन्समंन मुबारक शेख, दिपक बनसोडे व शिव स्वामी यांनी केले.























