मुंबई, ३० जुलै (हिं.स.) – मुंबईतील लालबाग परिसरात आज मंगळवारी पहाटे ५ वाजता झालेल्या सिलिंडर स्फोटात चार जण गंभीर जखमी झाले. घटना डॉ. एस. एस. राव रोडवरील मेघवाडी बिल्डिंग क्रमांक ३ मध्ये घडली. कुंदा राणे (४८) ७०-८० टक्के भाजली असून, तिची मुले अथर्व (१०) आणि वैष्णवी (१०) हे सुमार १५ ते २० टक्के भाजले आहेत. अनिकेत डिचवलकर (२७) ६० ते ७० टक्के भाजला आहे. सर्व जखमींवर कस्तुरबा आणि मसीना रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्फोटामुळे राणे यांच्या घरात मोठी आग लागली आणि सर्व साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. स्फोटाच्या आवाजाने परिसरात खळबळ उडाली आहे.हा स्फोट विक्रोळीतील दोन दिवसांपूर्वी झालेल्या गॅस सिलिंडर स्फोटानंतर घडल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संबंधित घटनेची अधिक चौकशी सुरू आहे.