जळगाव- भुसावळ दरम्यान कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये (गाडी क्र. ११०३९) तिकीट निरीक्षक एम. बी. शेख यांना डबा क्रमांक बी १ मध्ये एक सोन्याची चेन सापडली. त्याच्यावर असणाऱ्या हॉलमार्कवरून ती चेन ३२ ग्रॅमची आले. असल्याचे लक्षात आले बाजारभावा प्रमाणे त्या चेनची किंमत दोन लाखांच्या आसपास आहे. शेख यांनी आजूबाजूच्या बर्थवर विचारपूस केली पण कुणीही ती चेन आपली नाही असे सांगिले. त्यामुळे शेख यांनी ती चेन रेल्वे सुरक्षा बलाकडे सोपविली आहे. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापक एल. के. रणयेवले यांच्यासह सर्व स्तरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होतं आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















