Tuesday, September 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ग्रामीण रस्त्यांची दयनीय अवस्था, तातडीने रस्ते दुरुस्त करा, अन्यथा जनांदोलन करू : ९ गावच्या सरपंचांनी दिला इशारा!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 15, 2025
in marathwada
0
ग्रामीण रस्त्यांची दयनीय अवस्था, तातडीने रस्ते दुरुस्त करा, अन्यथा जनांदोलन करू : ९ गावच्या सरपंचांनी दिला इशारा!
0
SHARES
115
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तभा फ्लॅश न्यूज/माहूर : माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना स्वातंत्र्याचे तब्बल ७८ वर्षे पूर्ण होत आले असतानाही रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत असून त्यांचे जीवाचे हाल थांबायला तयार नाही.

तालुक्यातील बहुतांश रस्त्यांचे तीन तेरा वाजल्याने अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचे भाग्य उजाळणार कधी? हा त्या भागातील जनतेचा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे.

तांदळा मार्गे इवळेश्वर या डोंगराळ ग्रामीण भागातील रस्त्याची झालेली दूरवस्था बघितल्यावर येत असून पावसाच्या पाण्यामुळे दलदलीचे स्वरूप येऊन सदरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून तूर्तास रहदारी योग्य रस्ता तयार करुन द्यावा , अन्यथा! सामुहिक जन आंदोलन करणार! असा खणखणीत इशारा तब्बल ०९ गावच्या सरपंचांनी एकाचवेळी एका संयुक्त निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाला दि.14 जुलै रोजी दिल्याने संबंधित प्रशासनासह खळबळ उडाली आहे.याची प्रतिलिपी आ. भीमराव केराम यांनीही दिली आहे.

माहूर तालुक्यातील अतिदुर्गम आणि एकेकाळच्या नक्षलग्रस्त ग्रामीण भागातील गावच्या नागरिकांना दळणवळणाची एकमेव सुविधा असलेला केरोळी फाटा ते गुंडवळ – तांदळा मार्ग इवळेश्वर असा जाणारा रस्ता जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्याकडे वर्ग करुन घेतला.मात्र ,सदरील रस्त्याचे पावसाळ्याचे दिड महिने लोटूनही अद्याप दूपदरीकरणासह मजबुतीकरण करण्यात आले नसल्याने रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावर पायी चालणे देखील महाकठीण झालेले आहे.या मार्गावरील रस्त्यावरील पूले तुटली असून, रस्ता चिखलमय झाला आहे.सदर रस्त्याचे डांबरीकरचे काम मंजूर असून सध्या पावसाळ्यामुळे थांबले  आहे.

परिणामी या भागातील रस्ते अनेक ठिकाणी पावसाळ्यामुळे किंवा इतर कारणांमुळे चिखलयुक्त (दलदलीचे) झाले आहेत. यामुळे लोकांना ये-जा करण्यासाठी अडचणी येत आहेत.रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे किंवा खडी उखडल्यामुळे ते चिखलयुक्त झाल्याने लोकांना पायी चालणे, सायकल चालवणे, किंवा वाहन चालवणे कठीण कठीण झाले आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अडचणी येत असल्याने शेतीची कामे वेळेवर होत नाहीत. तसेच या भागात आपात्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा इतर आवश्यक सेवा वेळेवर पोहोचू शकत नाहीत.वस्तूंची वाहतूक कमी झाल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असून या समस्येचे निराकरण करण्यासाठी  रस्त्यांची नियमित दुरुस्ती आणि डांबरीकरण करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात पाणी निचरा होण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.स्थानिक संबंधित प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे.

या भागातील गावाच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे. या रस्त्यावरून चालताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. केरोळी फाटा ते गुंडवळ- तांदळा मार्गे इवळेश्वर,कुपटी हा मार्ग हल्ली खड्ड्यांचा मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावर एवढे खड्डे पडले आहेत की, या मार्गावरून प्रवास करणे नागरिकांच्या नाकीनऊ येत आहे.या रस्त्यावर अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. यावरून या रस्त्यावर किती मोठ्या प्रमाणात खड्डे असेल, याचा सहज अंदाज बांधता येतो. रस्त्यांवरील खड्ड्यामुळे रस्ता अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यातील खड्डेच आता नागरिकांच्या जिवावर उठले आहे. या भागातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने हजारो खड्डे नागरिकांच्या जिवाला कारणीभूत ठरत आहेत. रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत असेल तर या देशातील नागरिकांचे सर्वात मोठे दुर्दैव कोणते, हा प्रश्न आता सामान्य नागरिकांनाच छळायला लागला आहे.

रस्ते देशाच्या विकासाचे प्रतिक आहेत.रस्त्यावरुन देशाच्या विकासाची संकल्पना ठरविली जाते.त्यात ग्रामीण भागाच्या विकासात रस्त्यांची भूमिका महत्त्वाची असते.

त्यामुळे या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींनीही लक्ष देणे तेवढेच गरजेचे असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने दुपदरीकरण व डांबरीकरण होईल मात्र तुर्तास तात्पुरती सोय म्हणून केरोळी फाटा ते गुंडवळ- तांदळा मार्गे इवळेश्वर कुपटी या नादुरुस्त रस्त्याची दुरूस्ती करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने जनआंदोलन करण्याचा इशारा,नागरिकांसह तब्बल ०९ गावातील सरपंचांनी एकाचवेळी एका संयुक्त निवेदनाद्वारे आपल्या स्वाक्षरीने सार्वजनिक बांधकाम विभाग, माहूरला दिला आहे.

या निवेदनावर सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष (लखमापूर )गणेश राठोड, सौ. दुर्गा संतोष जाधव (तांदळा), रामेश्वर किसन जाधव (गुंडवळ),प्रविका इंदल राठोड (पवनाळा), वंदना दुधराम राठोड (ईवळेश्वर ),सुभाष किसन आडे (महादापूर), गजानन रमेश राठोड (बोरवाडी), प्रफुल बंडू भुसारे (कुपटी),सौ.सुलोचना अर्जुन पवार( दत्तमांजरी) या सरपंचांसह संतोष जाधव, विठ्ठल प्रेमसिंग राठोड, गजानन किसन कऱ्हाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post Views: 110
Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोलापूरात सिनगारे कुटुंबीयांना सांत्वनपर भेट

Next Post

Legislative Assembly : आमदार समाधान आवताडे यांच्या मागणीनंतर छावणी मालकांच्या बिलांना गती

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
Legislative Assembly : आमदार समाधान आवताडे यांच्या मागणीनंतर छावणी मालकांच्या बिलांना गती

Legislative Assembly : आमदार समाधान आवताडे यांच्या मागणीनंतर छावणी मालकांच्या बिलांना गती

ताज्या बातम्या

दोन मुख्य जलवाहिन्या फुटल्या; शहराचे पाणी रोटेशन पाच दिवसआड़ #viral #news #solapurnews #latestnews

September 28, 2026
हेरिटेज मणिधारी  संस्थेच्या सभेत खेळीमेळीने सर्व विषय एकमताने मंजूर

हेरिटेज मणिधारी  संस्थेच्या सभेत खेळीमेळीने सर्व विषय एकमताने मंजूर

September 28, 2026

सांगोला विद्यामंदिरमध्ये आज संत विचारांचा महाजागर

September 28, 2026

पैशांच्या व्यवहारातून सोलापूरजवळील कुंभारीत ५४ वर्षीय व्यक्तीची कुऱ्हाडीने हत्या

September 28, 2026
अक्कलकोट प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा ११ टक्के लाभांश; ६७ वी वार्षिक सभा उत्साहात

अक्कलकोट प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा ११ टक्के लाभांश; ६७ वी वार्षिक सभा उत्साहात

September 28, 2026
भावी अभियंत्यांना यशाची नवी दिशा; सिंहगडमध्ये दोन दिवसीय परिचय कार्यक्रम उत्साहात

भावी अभियंत्यांना यशाची नवी दिशा; सिंहगडमध्ये दोन दिवसीय परिचय कार्यक्रम उत्साहात

September 28, 2026
स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांची FRP-MSP लिंक करण्याची आणि ऊस उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी

स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांची FRP-MSP लिंक करण्याची आणि ऊस उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी

September 28, 2026
कायदेविषयक व्याख्यानातून विद्यार्थिनींना कायद्याचे मार्गदर्शन

कायदेविषयक व्याख्यानातून विद्यार्थिनींना कायद्याचे मार्गदर्शन

September 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1273945

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!