अभिजित गुरव यांनी २०१४ साली युपीएससी (UPSC ) व्दारे आयपीएस (IPS) पद मिळवून आसाम–मेघालय कॅडरमध्ये सेवा सुरू केली. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी धुबरी आणि तिनसुकिया जिल्ह्यांमध्ये एसपी (SP) म्हणून काम करताना अनेक आव्हानात्मक परिस्थिती यशस्वीरीत्या हाताळल्या. एका घटनेत, एका अल्पवयीन मुलीविरुद्ध झालेले लैंगिक अत्याचार हळूहळू एफआयआर (FIR ) शिवाय निष्पादित होण्याची शक्यता वर्तवली गेली होती. मात्र SP अभिजीत गुरव यांनी त्वरित विभागीय चौकशी (departmental inquiry) सुरू केली, संबंधित पोलीस अधिकारी निलंबित केले आणि आरोपीला अटक करण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची कायद्याने आपल्यावर असलेली जबाबदारी आणि आपले कर्तव्य यांच्याशी कोणतीही तडजोड न करता त्यांनी चोख भूमिका बजाविली होती.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















