सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, उपायुक्त आशिष लोकरे हे आज बाळे परिसरातील आदिला नदी सर्विस रोड ब्रिज तसेच नागरी आरोग्य केंद्र व यात्रा कालावधी सुरू होण्याच्या अनुषंगाने खंडोबा मंदिर दर्शन व परिसर पाहणी प्रसंगी बाळे येथे आले होते.
यावेळी त्यांनी श्रीक्षेत्र खंडोबा बाळे देवस्थान येथे श्री खंडोबा व राहू केतू स्थान यांचे दर्शन घेतले.
याप्रसंगी त्यांनी मंदिर परिसरातील पाणीपुरवठा, स्नानगृह,सौचालय ,रस्ते दिवाबत्ती व इतर मूलभूत सुविधांची माहिती घेतली त्यानुसार जिल्हा नियोजन समिती व सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून मंदिर परिसरातील विकास कामासाठी तीर्थक्षेत्र विकास योजना धर्तीवर सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बाळे परिसराचे माजी नगरसेवक गणेश पुजारी यांनी बाळे नागरी सुविधा केंद्रात सध्या उपलब्ध असलेली जागाही अपुरी पडत असून परिसरातील महिलांना प्रसूतीसाठी पाच ते सहा किलोमीटर अंतरावरून शहरातील दवाखान्याकडे जावे लागत असल्याने परिसरात नवीन अद्यावत प्रसूतीगृह व नागरी आरोग्य केंद्र उभारणी करण्याची मागणी केली. आयुक्त यांनी शासनाच्या मालकीची जागा सुचवा आपण त्या ठिकाणी प्रसूतीगृह व अद्यावत नागरी सुविधा केंद्र उभारण्याचा प्रस्ताव नव्याने शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी श्री खंडोबा देवस्थान समिती व पुजारी मंडळी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक गणेश पुजारी व मित्रपरिवार यांच्यावतीने आयुक्त व उपायुक्त यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख तपन डंके, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी,मुख्य आरोग्य निरीक्षक नरसिंग बच्चू , जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार, आरोग्य निरीक्षक सचिन वडवेराव जमादार मनू काळे उपस्थित होते.


















