परभणी / पूर्णा – पूर्णा नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून पूर्णाचे तहसीलदार माधवराव बोथीकर यांची शासनाने नेमणूक केली असून येत्या दहा तारखेपासून निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया तहसील कार्यालय पूर्णा येथे सुरू होणार आहे .
पूर्णा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच निवडणूक आयोगाने जाहीर केला असून यानंतर आता या निवडणूक साठी निर्वाचन अधिकारी व सहाय्यक निर्वाचन अधिकाऱ्याची नेमणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. पूर्णा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून पूर्णाचे तहसीलदार माधवराव बोथीकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
सहाय्यक निर्वाचन अधिकारी म्हणून नायब तहसीलदार प्रशांत थारकर तसेच पूर्णा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांची नेमणूक करण्यात आली आहे आता या निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया पूर्णा तहसील कार्यालयात १०ऑक्टोंबर पासून सुरू होणार आहे.

















