वेळापूर : येथील महानयोगी प.पू.सद्गुरू डॉ.भाईनाथ महाराज यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त सोमवार दि.१० नोव्हेंबर ते रविवार दि.१६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि.१० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वा. मूर्ती पुजन, रात्रौ.८.३० ते १०.३० वा. झी टॉकेज फेम ह.भ.प.धनंजय महाराज गुरव, धोंडेवाडी, मंगळवार दि.११ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ११ श्री संत गजानन महाराज शेगांव यांच्या गजानन विजय ग्रंथाचे पारायण, रात्रौ.८.३० वा. समाजप्रबोधनकार ह.भ.प.गोविंद महाराज बाबर, लातूर, बुधवार दि.१२ रोजी ह.भ.प.मोहिनीताई गुळीक, बारामती, गुरूवार दि.१३ रोजी विनोदाचार्य ह.भ.प.मच्छिंद्र कावडे महाराज, सुपली, शुक्रवार दि.१४ रोजी गायनाचार्य ह.भ.प.रोहन महाराज पवार, बिजवडी, शनिवार दि.१५ रोजी ह.भ.प.स्वामीराज महाराज भिसे यांचे प.पू.डॉ.भाईनाथ महाराज जन्मोत्सवाचे किर्तन तर रविवार दि.१६ रोजी ह.भ.प.प्रदिप महाराज ढेरे, धानोरे यांचे काल्याचे किर्तन सकाळी १० वा. होणार आहे.
शनिवार दि.१५ रोजी रात्रौ.१० वा. ह.भ.प.संकेत महाराज जावीर (गायनाचार्य), ह.भ.प.सिद्धनाथ महाराज गोरवे (गायनाचार्य), ह.भ.प.अंकुश महाराज तोरणे (गायनाचार्य), ह.भ.प.शहाजी महाराज गोरवे (गायनाचार्य), ह.भ.प.प्रविण महाराज साठे (बासरीवादन) व वेळापूर परिसरातील सर्व भजनी मंडळ यांचा जागर होणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी या किर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री आनंदमूर्ती सेवा मंडळ यांच्याकडून करण्यात आले आहे.

















