बार्शी – जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत तालुका पंचायत समिती बार्शीच्यावतीने सुलाखे हायस्कूल बार्शी येथे संपन्न झालेल्या तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धेत लहान गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ उपळाई (ठों) शाळेची विध्यार्थीनी कु. सानिका बालाजी ठोंगे हिने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तिची जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा स्तरीय स्पर्धा येत्या १२ तारखेला जिजामाता प्राथमिक शाळा शिशुविहार मंगळवेढा येथे होणार आहे. या तालुकास्तरीय स्पर्धेचे अतिशय उत्कृष्ट नियोजन विस्तार अधिकारी तथा प्रशासन अधिकारी भारत बावकर यांनी केले होते. तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बालाजी नाटके यांचे हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. तिला वर्गशिक्षिका श्रीमती दिपाली गोरे यांचेसह मुख्याध्यापक अनिल काळे, प्रभाकर काटे, आनंद घाडगे, रामचंद्र बरचे, हरिभाऊ दळवी, श्रीमती वैशाली खुने, श्रीमती बेबीनंदा खडबडे, श्रीमती सुवर्णगौरी गवळी, श्रीमती मीरा गरड यांचे मार्गदर्शन लाभले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















