तामसा / नांदेड – येथील आयुष शासकीय आयुर्वेदिक दवाखान्यात राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत शनिवारी (ता. ८) घेण्यात आलेल्या आयुष निदान व उपचार शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख , जिल्हा आयुष अधिकारी डॉ. सत्यनारायण मुरमुरे , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन अधिकारी डॉ. सुनील भंडारे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास बोंदरवाड यांनी शिबिराचे आयोजन केले होते. उद्घाटन जिल्हा आयुष अधिकारी डॉ. सत्यनारायण मुरमुरे यांच्या हस्ते व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांच्या उपस्थितीत धन्वंतरी पूजनाने झाले.
डॉ. सत्यनारायण मुरमुरे यांनी आयुर्वेदाचे महत्त्व सांगून सध्याच्या धावपळीत जीवनशैली बदलामुळे मधुमेह,रक्तदाब सारखे आजार वाढवल्याचे सांगितले . शिबिरात आयुर्वेदिक,युनानी, निसर्गोपचार पद्धतीने रुग्णांवर उपचार व मार्गदर्शन झाले.
हदगाव आयुर्वेदतज्ञ डॉ. उषा कदम यांनी रक्त मोक्षण (जलौकावचरण) नस्य, विद्कर्म आयुर्वेदिक पद्धतीद्वारे रुग्णांवर उपचार करून मार्गदर्शन केले.
या शिबिरात ४७२ रुग्णांनी लाभ घेतला. रुग्णांची रक्त, लघवी, तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. शिबिरात वार्धक्यजन्य आजार , वातव्याधी , त्वकविकार , नेत्रविकार,पंचकर्म, स्नेहन, स्वेदन जलौकावचरण नस्य, विद्कर्म पद्धतीने उपचार करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी सूर्यवंशी डॉ. दीपक कदम, डॉ. उषा कदम , डॉ. दिलीप मंडलवार , डॉ. शेख जमील, डॉ. नरेंद्र रणवीरकर, डॉ. विजयालक्ष्मी घोडजकर , डॉ. सिद्धार्थ पोहरे ,डॉ.सुरेश डोंगरे, नेत्र चिकित्सक सिद्धेश्वर सूर्यवंशी यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र व आयुर्वेदिक दवाखाना तामसा व वायफना येथील आरोग्य कर्मचारी, आशावर्कर यांनी प्रयत्न केले.
औषध निर्माण अधिकारी मोहनकुमार मेड यांनी प्रस्तावना केली. सूत्रसंचालन औषध निर्माण अधिकारी गजानन झाडे यांनी केले. आभार औषध निर्माण अधिकारी संजीवनी पारधी यांनी मानले.
























