चाकूर / लातूर – चाकूर तालुक्यातील चापोली येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा विजेच्या खांबावरून पडून
दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि.११ नोव्हेंबर मंगळवार रोजी सकाळी घडली आहे.
सकाळी दहा वाजेच्या सुमारास चापोली येथील ग्रामपंचायत कर्मचारी सुर्यकांत उर्फ गजानन भिसे (वय ३५) महामार्गालगत असलेल्या सर्वीस रोडवर असलेल्या विद्युत खांबावरील लाईट दुरुस्तीचे काम करण्यासाठी गेला होता.अचानक यावेळी विज प्रवाह चालू झाल्याने ग्रामपंचायत कर्मचारी सुर्यकांत उर्फ गजानन भिसे यांचा विजेच्या शॉकने वरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला.भिसे हा चापोली ग्रामपंचायत येथे सफाई कर्मचारी होता.मग तो कोणाच्या सांगण्यावरून विद्युत पोलावर चढला असा सर्वसामान्य जनतेमध्ये उपस्थित केला जात आहे.
पोलारून पडल्यानंतर भिसे यांना तातडीने चाकूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यावेळी तपासणी अंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
सदरील मयत व्यक्तीच गजानन उर्फ सुर्यकांत भिसे यांच्या पश्चात आई-वडील, तीन भाऊ, दोन बहिणी असा मोठा परिवार आसुन त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.सदर घटनेमुळे संतप्त ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने या घटनेला जो कोणी जबाबदार आहे त्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत असे या वेळी ग्रामपंचायत कामगार सेना चाकूर तालुका अध्यक्ष भरत खलशे,उपाध्यक्ष सोपान कसबे यांनी सांगीतले असून मयत कर्मचारी सुर्यकांत उर्फ गजानन भिसे यांच्या कूटूंबाला योग्य ती मदत मिळावी ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या प्रकरणांत नेमका कोण दोषी आहे याची तात्काळ चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
























