माढा : देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून सकाळी ६ वाजता माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी माढा येथील कसबा पेठेतील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेतले.यावेळी आमदार अभिजीत पाटील यांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीची पूजा करून आरती केली. “आषाढी एकादशी हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत पवित्र आणि आनंदाचा सण आहे. या मंगल दिनी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होताना मनात एकच भावना आहे की, माझ्या माढा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचे जीवन सुख, समृद्धी आणि समाधानाने न्हाऊन निघू दे,” अशा भावना आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या.दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार अभिजीत पाटील म्हणाले की, “आज विठ्ठल चरणी प्रार्थना करताना मी मतदारसंघातील बळीराजाला उत्तम पर्जन्यवृष्टी लाभू दे, सर्वांना उत्तम आरोग्य लाभू दे आणि माढा मतदारसंघाचा प्रलंबित व सर्वांगीण विकास वेगाने पूर्ण होऊ दे, असे साकडे घातले आहे.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे, मा. नगरसेवक शहाजी साठे, दिनेश जगदाळे, गणेश भांगे,देवीदास गवळी, पिंटू कदम, सागर पाटील,सागर खरात,आबा साठे, अनिल कदम,स्वाभिमान कदम, अक्षय शिंदे,पुजारी बापू कुंभेजकर, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विठ्ठल भक्तांची मोठी उपस्थिती होती. दर्शन घेतल्यानंतर आमदार पाटील यांनी उपस्थित वारकरी व भाविकांशी संवाद साधून त्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.