भोकरदन / जालना : आपली जीवनशैली ही निसर्गाला अनुरूप ठेवण्याची ताकद ही नैसर्गिक व पर्यावरणपुरक शेतीतच आहे. नैसर्गिक शेती ही शाश्वत शेती आहे असे मत ॲग्रोव्हिजन गटशेती संघांचे संस्थापक प्रमुख संजय मोरे पाटील यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची शेतकऱ्यांसाठी स्वयंप्रेरनेने चालविलेली संपुर्ण शेती चळवळ हे ब्रीद घेऊन चाललेल्या ॲग्रोव्हिजन गटशेती संघाच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेस आयोजिण्यात येणारे नोव्हेंबर महिन्यातील नियमित मासिक चर्चासत्र रविवारी भोकरदन तालुक्यातील मौजे वालसा वडाळा , येथे पार पडले. त्या प्रसंगी संजय मोरे पाटील बोलत होते. नैसर्गिक संसाधनाचा वापर करून जमिनीचे बिघडत चाललेले आरोग्य सुधारल्या जावू शकते. जल, जंगल आणि जमिनीचे आरोग्य वाचवू शकलो तर भविष्यातील पिढ्यासाठी दायित्व म्हणून आपण काही तरी देऊ शकू असेही संजय मोरे पाटील म्हणाले.
डॉ. गणेश पाटील पोटे हे गेल्या चार वर्षांपासून आपली दहा एक्कर शेती एसआरटी पद्धतीने करत आहेत. त्या शेतीतील कपाशी, तूर, मका या शेतीत यावेळी शिवारफेरी करण्यात आली. ही सर्व पिके पाहून उपस्थित शेतकरी समाधान पावले.
उपस्थित शेतकऱ्यांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला. भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी अकोला देव येथील सुधीर जोशी, पळसखेडा पिंपळे येथील गणेशबापू पिंपळे, गजानन पिंपळे, एकनाथ पिंपळे, निवृत्ती पिंपळे, लक्ष्मण पिंपळे, ज्ञानेश्वर सिनगारे,कंडारी बु. विकास सोनोने, तपोवनचे रावसाहेब मालुसरे, सुभाष घोडके, विष्णू लोखंडे, प्रकाश गुळवे, सुधाकर रोडे, श्री. गणेश साबळे, वडाळा अशोक सोळंके यांच्यासह अनेकांची उपस्थित होते.
























