टेंभुर्णी – संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या नियुक्तीबद्दल विविध ठिकाणी त्यांचे अभिनंदन व स्वागत करण्यात येत आहे.
टेंभुर्णी येथील कुर्डूवाडी चौकात सचिन जगताप यांचा सत्कार डी.व्ही.पी. चे चेअरमन औदुंबर भाऊ देशमुख-महाडीक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी जगताप यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास बेंबळे गावचे नेते वाय. जी. भोसले, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष अनिल जगताप, मार्केट कमिटी सदस्य धनंजय मोरे, बेंबळे येथील बालाजी फाळके, संभाजी ब्रिगेडचे सचिन पराडे, टेंभुर्णीचे राजेंद्र मुळे, छायाचित्रकार नवनाथ जाधव, शिवलाल थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित सर्वांनी सचिन जगताप यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेडची चळवळ अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला व शुभेच्छा दिल्या.

















