जिंतूर / परभणी : क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने रत्नागिरी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत कै. उत्तमराव जोगवाडकर माध्यमिक व उच्च माध्य मिक आश्रम शाळा, चारठाणा (ता. जिंतूर, जि. परभणी) येथील विद्यार्थिनी संस्कृती गजानन वहाड हिने १७वर्षांखालील मुलींच्या गटात ३००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक मिळवून विद्याल याचा गौरव वाढविला आहे.
संस्कृतीच्या या उल्लेखनीय यशा बद्दल विद्यालयात तसेच स्थानिक पातळीवर सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. या विजयानंतर संस्थेचे अध्यक्ष शशिकांतराव देशपांडे,सचिव विजयराव कान्हेकर, इतर मागास बहुजन कल्याण विभाग परभणीचे सहाय्यक संचालक रामेश्वर मुंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, पोळे, नाटकर, दिलीप चव्हाण, संस्कृतीचे पालक गजानन क्हाड, गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तुळशीराम पालवे तसेच विद्यालया तील सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व क्रीडा मार्गदर्शक गजानन सोर यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
चार ठाणा आश्रम शाळेने २००४ पासून क्रीडा क्षेत्रात भक्कम परंपरा निर्माण केली असून दरवर्षी तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावर अनेक विद्यार्थी चमक दाखवत आहेत. कब्बडी, व्हॉली बॉल आणि मैदानी स्पर्धा मध्ये दरवर्षी पाच ते दहा विद्यार्थी राज्यस्तरीय पातळीवर पोहोचत आहेत. संस्कृतीच्या या कांस्य विजयाने विद्यालयासह जिंतूर तालुका आणि परभणी जिल्ह्याचा अभिमान वाढविला आहे.






















