परभणी – बिहारमधील सुज्ञ मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील N.D.A. आघाडीला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्या बद्दल पालकमंत्री मेघना दीदी साकोरे बोर्डीकर, मा.आ.रामप्रसादजी बोर्डीकर साहेब व जिल्हाध्यक्ष सुरेशजी भुमरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज जिंतूर येथे फटाके फोडून विजयी जल्लोष करण्यात आला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष गोविंद थिटे पाटील, मा.जी.प.सभापती नानासाहेब राऊत, डॉ. पंडीत दराडे, ऍड.सुनील मते, गंगाधर अप्पा तरटे, आबासाहेब खेत्रे, विलास भंडारे, अशोक शिंपले, विठ्ठल रोकडे, श्याम पवार, मतीन तांबोळी, भास्करराव थिटे, सुयोग मुंढे, अखलाक काझी, रमेश मोहिते यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
बिहार विकासाच्या, स्थैर्याच्या आणि राष्ट्रभक्तीच्या मार्गावर उभं राहिलं असून बिहारची जनता एनडीए सोबत आहे, हे आज बिहारच्या विजयातून सिद्ध झाले. या विजयाबद्दल बिहारच्या जनतेचे मनःपूर्वक आभार…!
कर्मठ कार्यकर्त्यांची मेहनत, विजयी उमेदवारांचे अथक परिश्रम आणि सामान्य जनतेचा अटळ विश्वास यांच्या जोरावर आज बिहारमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा भगवा फडकला आहे.

















