Thursday, September 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कोल्हापूर येथील ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिरा’त रणरागिणी बनण्याचा निर्धार !

तरुण भारतbyतरुण भारत
December 8, 2025
in marathwada
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर – समाजात रस्त्यावर अथवा अन्य कुठेही होणारी छेडछाड, गुंडांकडून होणारा त्रास यांसह कोणत्याही कठीण प्रसंगांना आत्मविश्वासाने तोंड देण्याचा आणि छत्रपती ताराराणींचा आदर्श ठेवत युवतींनी रणरागिणी बनवण्याचा निर्धार केला. हिंदु जनजागृती समिती, सव्यसाची गुरुकुलम् आणि भागीरथी महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिवप्रतापदिनाचे औचित्य साधून ७ डिसेंबर या दिवशी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, कोल्हापूर येथे शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिरात हा निर्धार व्यक्त करण्यात आला. या शिबिरात कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव जिल्ह्यातील एक हजारहून अधिक युवतींनी सहभाग नोंदवला.

    या प्रसंगी विविध कठीण प्रसंगांमध्ये युवती-महिलांनी स्वत:चा बचाव कसा करावा, यांविषयीची बचावांच्या सोप्या पद्धतीची प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली, तसेच कराटे आणि लाठी-काठी यांचेही प्रशिक्षण देऊन तेही त्यांच्याकडून करवून घेण्यात आले. सव्यसाची गुरुकुलम् मधील प्रशिक्षित वीर आणि वीरांगना यांनी दाखवलेल्या युद्धकालीन प्रात्यक्षिकांमुळे नवचैतन्य निर्माण झाले. सहभागी प्रत्येक युवतीला प्रशिस्तपत्रक देण्यात आले.
    या शिबिरात ‘आंतरराष्ट्रीय नेमबाज’ तेजस्विनी सावंत, ‘आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर’ स्नेहांकीता वरुटे, ‘आंतरराष्ट्रीय आर्यनमॅन’ सौ. माहेश्वरी सरनोबत,  सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, सव्यसाची गुरुकुलम्चे प्रधान आचार्य श्री. लखन जाधव, उद्योजक श्री. नितीन वाडीकर, कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनामधील निर्भया पथकात कार्यरत श्री. बाबासाहेब कोळेकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. प्रारंभी दीपप्रज्वलन झाल्यावर श्री. सुनील घनवट, श्री. नितीन वाडीकर आणि श्री. लखन जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला.क्षात्रतेजयुक्त आणि युवतींना दिशा देणारे मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन !स्वरक्षण हा आपला अधिकार असून राष्ट्र प्रथम संकल्पनेसाठी कार्य करा 

! – सुनील घनवट

, हिंदु जनजागृती समिती 

 
      स्वसंरक्षण, सामर्थ्य, स्वाभिमान निर्माण करण्यासाठी यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून याचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून तुमचे सामर्थ्य वाढेल. या प्रकारचे शिबिर यापुढील काळात देशभरात आयोजित केले जातील. युवतींनी यापुढील काळात त्यांच्यावर होणार्‍या आघातांसाठी लढायचे आहे, रडायचे नाही याचा ठाम निर्धार करावा. स्वरक्षण हा आपल्या प्रत्येकाचा अधिकार असून राष्ट्र प्रथम या संकल्पनेसाठी कार्य करा.’’


     श्री. लखन जाधव  म्हणाले, ‘‘हे शिबीर महाराणी ताराराणी आणि शक्तीपीठ असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या छत्रछायेखाली होत आहे. नवरात्रात ज्याप्रमाणे देवीने राक्षसांचे निर्दालन केले त्याचप्रमाणे आपणही आपल्यातील शक्ती जागृत करून हिंदु राष्ट्रासाठी कार्य केले पाहजे. आपल्या हातात जे येईल ते शस्र घेऊन, स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे.’’ श्री. नितीन वाडीकर म्हणाले, ‘‘केवळ शरीर सक्षम असून उपयोग नाही, तर मनही सक्षम असणे आवश्यक आहे त्यासाठी या शिबिराची आवश्यकता आहे.’’
     सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये म्हणाल्या, ‘‘झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासह भारतात अनेक शूरवीर वीरांगणा होऊन गेल्या आहेत. त्यांचा आदर्श आपण नेहमी ठेवला पाहिजे. स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतांना शारीरिक, मानसिक आणि आत्मबळाच्या स्तरावरही सक्षम व्हायला हवे. त्यासाठी आपल्या कुलदेवतेचा नामजप केला पाहिजे ज्यामुळे आत्मबळ वाढेल. युवतींनी कोणाशीही व्यवहार करतांना सतर्क रहावे. आपला मोबाईल नंबर किंवा हॅण्डसेट अनोळखी व्यक्तींना दिला जाणार नाही, याची काळजी घ्यावी, तसेच युवतींनी त्यांच्या पर्समध्ये सुरक्षिततेसाठी मिरची पूड, पेपर स्प्रेपण ठेवावा.’’निर्भया पथकाचे पोलीस हवालादार बाबासाहेब कोळेकर म्हणाले, ‘‘आज शिकवलेल्या शिबिरातून जर प्रत्येक युवतीने जर स्वरक्षण केले, तर समाजात घडणार्‍या अपप्रवृत्तींना निश्चित आळा बसेल ! पोलीस आणि कायदा तुमच्या पाठीशी असून निर्भया पथक २४ तास तुमच्या पाठिशी आहे. आज तुम्हाला जे प्रशिक्षण मिळाले आहे ते तुमचे भाग्य आहे, असे प्रशिक्षण प्रत्येक ठिकाणी होणे आवश्यक आहे.’’


      तेजस्वीनी सावंत म्हणाल्या, ‘‘युवतींनो स्वसंरक्षण प्रशिक्षित होऊन स्वत:ला सक्षम बनवा. स्वरक्षण प्रशिक्षाच्या माध्यमातून युवतींचा आत्मविश्वास वाढतो आणि नवी ओळख निर्माण होते. प्रशििक्षत झाल्यास आपल्याला संकटांतून निभावून जाण्याचे बळ मिळते. आपण कोणत्याही क्षेत्रात असला, तरी राष्ट्रासाठी, देशासाठी काहीतरी चांगले कार्य करण्याची उम्मेद ठेवा. देशसेवा करता येणे हे अभिमानास्पद आहे. त्यामुळे मातृभूमीसाठी जगा.’’ स्नेहांकिता वरूटे म्हणाल्या, ‘‘युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. समाजाने ‘स्री’चा सन्मान केला पाहिजे. युवतींनो, समाजातील विघातक प्रवृत्तींपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घ्या. प्रशिक्षण म्हणजे कला नसून तो आत्मसंरक्षण आणि आत्मविश्वास वाढवणारी व्यवस्था आहे.


शिबिरातातील ठळक घडामोडी
१. शिबिरस्थळी ठेवण्यात आलेल्या ‘सेल्फी पॉईंट’द्वारे अनेक युवतींनी सेल्फी घेत लढण्याचा निर्धार केला.
२. यापुढील काळात ‘आम्ही अबला नाही, तर रणरागिणी बनू’, अशी प्रतिज्ञा प्रत्येक युवतीने घेतली.
३. पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या गडकरी सभागृहात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांची माहिती देणारे क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शनही लावण्यात आले होते. येथे सव्यासाची गुरुकुलम वतीने ऐतिहासिक, दुर्मिळ शिवकालीन शस्रास्रांचे विशेष प्रदर्शन येथे लावण्यात होते. हे प्रदर्शन पाहून अनेकांनी जाज्वल्य इतिहासाचे स्मरण झाले असे सांगितले.
४. या शिबिरात हुबळी ते कोल्हापूर २३० किलोमीटर अंतर सायकलवरून पार करणारी आणि ‘ गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मिळवणारी कु. शौर्या शिंदे हिचा सद् गुरु स्वाती खाडये यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.


उपस्थित मान्यवर – भाजपच्या वंदना बंबलवाड, वैद्या अश्निनी माळकर, पोलीस मित्र अर्चना गुरव, उद्योजक श्री. जयंतीलाल पटेल, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, हिंदू जागरणचे धर्मप्रचारक श्री. सनी पेनकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु महासभेचे श्री. विकास जाधव आणि श्री. प्रशांत पाटील, श्री. अमर जाधव, हिंदू एकता आंदोलनाचे शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव काशीद, मराठा तितुका मेळवावाचे श्री. योगेश केरकर, ‘इस्कॉन’चे श्री. दीपक खोत 

Post Views: 88
Previous Post

संविधानानुसार समाजनिर्मिती व्हावी हेच ध्येय असले पाहिजे : – डॉ. रमेश माधवराव पांडव 

Next Post

पुणेची गार्गी व नाशिकची भक्ती मुख्य फेरीत प्रवेश; महिलांची राष्ट्रीय मानांकन लॉन टेनिस स्पर्धा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पुणेची गार्गी व नाशिकची भक्ती मुख्य फेरीत प्रवेश; महिलांची राष्ट्रीय मानांकन लॉन टेनिस स्पर्धा

ताज्या बातम्या

रोबोटने केले पवारांचे स्वागत…. #viral #news #marathinews

September 23, 2026

दुःख सांगत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात फोडला हंबरडा #viral #news #marathinews

September 23, 2026
सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात श्री गणेशाला भावपूर्ण निरोप

सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात श्री गणेशाला भावपूर्ण निरोप

September 23, 2026
महापालिका , मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचा संयुक्त उपक्रम

महापालिका , मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचा संयुक्त उपक्रम

September 23, 2026
बाळीवेस शक्तिपूजा समाजसेवा मंडळाच्या अध्यक्षपदी थोबडे

बाळीवेस शक्तिपूजा समाजसेवा मंडळाच्या अध्यक्षपदी थोबडे

September 23, 2026
स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूल मधील (U-14) मुली रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये यश

स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूल मधील (U-14) मुली रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये यश

September 23, 2026
तायक्वांदो स्पर्धेत एमआयटीच्या सूर्यतेज पाटीलची जिल्हास्तरावर निवड

तायक्वांदो स्पर्धेत एमआयटीच्या सूर्यतेज पाटीलची जिल्हास्तरावर निवड

September 23, 2026
सामंजस्यामध्ये समाजातीलच नव्हे तर जगातील प्रश्न सोडविण्याची शक्ती : ॲड. मिलिंद थोबडे 

सामंजस्यामध्ये समाजातीलच नव्हे तर जगातील प्रश्न सोडविण्याची शक्ती : ॲड. मिलिंद थोबडे 

September 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1249185

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!