Thursday, April 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

संविधानानुसार समाजनिर्मिती व्हावी हेच ध्येय असले पाहिजे : – डॉ. रमेश माधवराव पांडव 

तरुण भारतbyतरुण भारत
December 8, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे –  “संविधानानुसार समाजनिर्मिती हीच आपली दिशा आणि ध्येय असयाला पाहिजे असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ.रमेश पांडव  यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन संत ज्ञानेश्वर सभागृहात करण्यात आले होते. त्याप्रंसगी ते बोलत होते. यावेळी प्र – कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी विद्यापीठ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. रमेश माधवराव पांडव, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, अधिष्ठाता प्रा. (डॉ.) विजय खरे, डॉ. संजय तांबट, अधिसभा सदस्य शंतनू लामदाडे, प्रा. (डॉ.) राजेंद्र घोडे, प्रा. (डॉ.) विलास आढाव, डॉ. संजय देसले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुधाकर बोकेफोडे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनिल भंडगे, डि. एस. सावकार अध्यासनाचे प्रमुख डॉ. अशोक कांबळे,  प्रा. (डॉ.) राधाकृष्ण पंडित आदी मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण आदरांजली वाहिली. याप्रसंगी विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विविध कर्मचारी आणि विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात विशेष व्याख्यानासाठी आमंत्रित प्रमुख वक्ते डॉ. रमेश माधवराव पांडव यांनी राष्ट्रपुरुष : डॉ. बाबासाहेब या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी महापुरुषांचे स्मरण म्हणजे इतिहास पठण करणे नाही तर बाबासाहेबांने आपल्याला  दिलेल्या संविधानानुसार समाज उभारण्याची दिशा ठरवण्याचा क्षण आहे.” त्यांच्या मते, सामाजिक समता, आर्थिक स्वावलंबन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवी मूल्ये ही संविधानाची तत्त्वे प्रत्येकाने आपल्या प्रत्यक्ष कृतीत आणणे हीच खरी महापरिनिर्वाण दिनाची कृतज्ञ आठवण असल्याचे यावेळी सांगितले. आपल्या अनुभवातून समाजातील विषमता अधोरेखित करत त्यांनी सेवा वस्त्यांचे वास्तव आणि गरिबीचे कटू चित्र मांडले. पुणे, नाशिक आणि संभाजीनगरातील शेकडो सेवा वस्त्यांचा उल्लेख करत “अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि संस्कार या प्रत्येक भारतीयाच्या मूलभूत गरजा आहेत; एका कुटुंबालाही उभे केल्यास समाज उभा राहतो,” असे ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा संदर्भ देत जातव्यवस्थेचा इतिहास, तिच्या विघटनातील अडथळे, आणि परिवर्तनासाठीची दोन उपाययोजना — व्यवसायबदल व आंतरजातीय विवाह — यावरही त्यांनी स्पष्ट आणि मार्मिक भाष्य केले. “भिंती मोडल्या शिवाय एकसंघ भारत घडणार नाही,” या  बाबासाहेबांच्या संदेशाचे स्मरण त्यांनी उपस्थितांना करून दिले.“महापुरुषांची जयंती–पुण्यतिथी म्हणजे परंपरेची पूर्तता नव्हे; ती आपल्या कृतींचा आढावा घेण्याची वेळ आहे. भेदभाव कमी करण्यासाठी, समाज बदलण्यासाठी आणि स्वतःच्याही भविष्याची दिशा ठरवण्यासाठी प्रत्येकाने एक ठोस ध्येय निश्चित केले पाहिजे.” असे डॉ. पांडव यांनी विद्यार्थ्यांना आवाहनही केले. 

“महापुरुषांचे स्मरण ही परंपरा नसून आपल्या कृतीचे आणि कर्तव्यभावनेचे वर्षभराचे आत्मपरीक्षण आहे. बाबासाहेबांचे विचार भावना जागवण्यासाठी नव्हे, तर कृतिशील होण्यासाठी आहेत. आपण ठरवलेला सामाजिक टप्पा वर्षात पूर्ण झाला तर आनंद; न झाल्यास ‘का नाही?’ याचा प्रामाणिक विचार व्हावा. बाबासाहेबांचे २५ नोव्हेंबर १९४९ चे भाषण आणि त्यांचा ‘प्रथम भारतीय, अंतिम भारतीय’ हा संदेश आपल्या दैनंदिन कृतीत उतरला तरच स्मरणाला अर्थ प्राप्त होतो. मूर्तिपूजन नव्हे, तर विचारांचे आचरण—यातूनच खरे परिवर्तन आणि संविधानानुसार समाजनिर्मिती शक्य आहे.” असे व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना सांगितले. याप्रसंगी उपस्थितांनी बुद्धवंदनेने बाबासाहेबांना अभिवादन केले. अधिष्ठाता डॉ. संजय तांबट यांनी उपस्थितांना प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन जाधव यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे अध्यासनप्रमुख  डॉ.सुधाकर बोकेफोडे यांनी केले.

Post Views: 35
Previous Post

वालचंद अभियांत्रिकी शिक्षक व शिक्षकेतर संघाची विजयी सलामी

Next Post

कोल्हापूर येथील ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिरा’त रणरागिणी बनण्याचा निर्धार !

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कोल्हापूर येथील ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिरा’त रणरागिणी बनण्याचा निर्धार !

ताज्या बातम्या

रईस शाह मौलाना यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे

April 23, 2026

मंठा तालुक्यात नंबर प्लेट नसलेल्या वाळू वाहतूक करणाऱ्या १० वाहनांवर कारवाई

April 23, 2026

स्वतःच्या प्रगतीसाठी आरशाप्रमाणे आत्म – अवलोकन करा

April 23, 2026

वालचंद महाविद्यालयाचे प्रा. परमेश्वर कमळे यांना पीएच .डी. प्रदान

April 23, 2026
मानाचा आजोबा गणपती ट्रस्ट तर्फे 100 गोर, गरिब, बेघर निराधार वंचितांना रस पुरणपोळी जेवण

मानाचा आजोबा गणपती ट्रस्ट तर्फे 100 गोर, गरिब, बेघर निराधार वंचितांना रस पुरणपोळी जेवण

April 23, 2026
गावकऱ्यांनी केलेला सत्कार लाखमोलाचा असतो – सत्कारमुर्तींची भावना

गावकऱ्यांनी केलेला सत्कार लाखमोलाचा असतो – सत्कारमुर्तींची भावना

April 23, 2026
विचारक्रांती तर्फे महामानवाची सांगता मिरवणूक जल्लोषात साजरा

विचारक्रांती तर्फे महामानवाची सांगता मिरवणूक जल्लोषात साजरा

April 23, 2026
नियमितता, शिस्त व चिकाटी यामुळे यश प्राप्ती : बिद्री

नियमितता, शिस्त व चिकाटी यामुळे यश प्राप्ती : बिद्री

April 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0825206

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697