सोलापूर – एस.टी.स्टँड येथे गर्दीचा फायदा घेवून प्रवासी महिलेचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीस दोन तासात फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्यावतीने अटक करण्यात आली. प्रवाशी महिला सिंधु भारत डोईफोडे यांना या बाबत पोलीसांनी तात्काळ माहीती देताच नमुद वयोवृध्द महिला प्रवाशी यांचे अश्रू अनावर झाले व त्यांनी पोलीसांचे आभार मानले आहेत.
दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी प्रवाशी महिला सिंधु भारत डोईफोडे वय ६० वर्षे, रा.मु.पो. हिरेमठ हॉस्पीटल जवळ, रिंग रोड, बाशी, जि. सोलापूर या दुपारी मैत्रीणी रत्नमाला हिरे, व शोभा हिरे रा.बाशी जि. सोलापूर असे अक्कलकोट येथून देव दर्शन करुन अक्कलकोट ते सोलापूर गाडीत बसून सोलापूर एस.टी. स्टॅन्ड येथे दुपारी ४.०० वा.चे सुमारास उतरुन तिथे दहा पंधरा मिनीट एस.टी स्टॅन्ड येथे थांबले. वाशीला जाणारी बस फलाटवर बस आल्याने तिघी बसमध्ये चढत असताना गळ्यातील मणी मंगळसुत्र खेचल्यासारखे जाणवले, मागे वळून पाहिले असता ४५ ते ५० वर्षे वयाची महिला जिने अंगात एक करड्या रंगाची साडी घातलेली महिला मणी मंगळसूत्र घेवून जाताना दिसली. तिच्या मागे जात असताना आम्ही गर्दीतून बाहेर येईपर्यंत ती तेथुन निघुन गेली. त्या महिलेचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. याची माहिती पती व मुलगा यांना सांगितली. पोलीसांकडे तक्रार देण्यास त्यांनी सांगीतले. लागलीच फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे पोलीसांना माहीती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांना तक्रारदार यांनी माहीती देताच त्यांनी संवेदनशिलता दाखवुन वयोवृध्द महिलेस धीर देवुन त्यांची तक्रार तात्काळ नोंदवून घेवुन, फौजदार चावडी पोलीस ठाणे गु.र.क्र.९३३/२०२५ भा.न्या. संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला, गुन्हा दाखल होताच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षिरसागर यांना पथकासोबत सदर गुन्हयातील आरोपीत याचा तात्काळ शोध घेण्याबाबत आदेश दिले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत व पोलीस निरक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर व त्यांचे पथकाने तात्काळ या आरोपीत महिलेचा शोध सुरु केला. दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ” एक अंदाजे ६० वर्ष वयाचो महिला जिने करडया रंगाची साडी घातलेली आहे. ती सोलापूर एस.टी. स्टॅन्ड येथे फिरत आहे.” अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. याची योग्य ती खात्री व शहानिशा करून या महिला आरोपीतास पोलीसांनी तक्रार प्राप्त झाल्यापासुन दोन तासातच ताब्यात घेतले व तिचे नांव पत्ता विचारले असत्ता महानंदा राम राठोड वय ५० वर्ष, रा.मु. कानडे पिपळगांव, पोस्ट, हिरापुर ता. गेवराई जि.बीड असे सांगीतले, या महिला आरोपीताकडे महिला पोलीसांमार्फत कसून चौकशी करताना तीने गुन्हा केल्याची कबुली दिली व तिचेकडून चोरीचे सोन्याचे मणीमंगळसुत्र जप्त करण्यात आले.





















