अक्कलकोट – गौडगाव बु!! येथील श्री गुरु सिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र संचलित श्री जगद्गुरु पंचाचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रथमतः संस्थेचे प्रतिनिधी श्री योगीराज हिरेमठ यांच्या हस्ते गणित तज्ञ डॉ.श्रीनिवास रामानुजन अय्यंगार यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक कल्याणी देशेट्टी होते. यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे माजी विद्यार्थी इसुब शेख . जेऊरवाडी चे सरपंच संदीप राठोड . ज्येष्ठ शिक्षक महेश स्वामी .शरणया हिरेमठ .शिवपुत्र चोले. उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक गणित विभाग प्रमुख तथा पर्यवेक्षक लाडाप्पा शिंदे यांनी केले यावेळी कुमारी अंबिका नागलगाव .अंजली धनशेट्टी .अंजली चव्हाण.कुमारी कुंभार.सौ सुनीता हिंडोळे यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणित सूत्र.चार्ट. प्रतिकृतीची प्रदर्शन भरवण्यात आले होते मुख्याध्यापक कल्याणी देशेट्टी बोलताना म्हणाले श्रीनिवास रामानुजन अय्यंगार अत्यंत हुशार होते लहान वयात त्यांनी गणिताची सिद्धांत मांडले जगभरातील अनेक विद्वानांनी त्यांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केले अपार बुद्धिमत्तेची जोरावर त्यांनी गणितीय विश्वास निर्माण केले गणितातील विविध प्रकारचे सूत्रे. प्रमेय . सिद्धांत लिहिले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ भारती पोतदार मॅडम .सुभाष घोडके. मृत्युंजय सालीमठ .लक्ष्मी चौधरी. मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले .सूत्रसंचालन गणित शिक्षक काशिनाथ दानशेट्टी यांनी केले तर पोपट सोनकांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.


















