Thursday, April 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ग्रामदैवत सिध्देश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळ बरखास्तीचा अर्ज फेटाळला

तरुण भारतbyतरुण भारत
December 25, 2025
in crime
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – अनेक आरोप करून विश्वस्त मंडळ बरखास्त करावे अशी मागणी करणारा संजय भीमाशंकर थोबडे यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायद्याच्या कलम ४१-ड अन्वय केलेला अर्ज पुणे विभागाचे सह आयुक्त राहुल मामू यांनी नुकताच फेटाळला आहे. ट्रस्टचे नियमन करताना विश्वस्तांच्या हातून घडलेल्या काही कृती या ट्रस्टचे जाणीवपूर्वक नुकसान करणाऱ्या तसेच विश्वस्तांना वैयक्तिक लाभ मिळवून देण्यासाठी हेतुपूर्वक केल्या नसतील आणि तत्कालीन परिस्थितीनुसार ट्रस्टच्या उद्दिष्ट प्राप्ती साठी काही निर्णय घ्यावे लागले असतील तर त्यासाठी  विश्वस्त मंडळ बरखास्तीसारख्या टोकाच्या निर्णयाची आवश्यकता नसून, सुधारात्मक उपाय करण्याचे निर्देश देणे आवश्यक आहे, अशी मार्गदर्शक तत्वे या निकालामध्ये अधोरेखित केली आहेत.

योगीकुलचक्रवर्ती शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर हे महादेवाचे अवतार! सोन्नलगी म्हणजे सोलापूर ही श्री सिद्धरामेश्वरांची तपोभूमी व कर्मभूमी होय. महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातील लाखो भाविकांची श्रद्धास्थान आहे. दर वर्षी मकरसंक्रांतीच्या वेळी होणारी गड्डा यात्रा ही संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे.

श्री सिद्धरामेश्वरांच्या  कृपाशीर्वादाने स्थापन झालेली श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी ही धार्मिक, सामाजिक, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात गेली 140 वर्षापासून उत्तम व पारदर्शक लोककल्याणकारी  व समाजपोयोगी  कार्य करणारी संस्था आहे. अशा या महत्वच्या धार्मिक ट्रस्टचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांचेसह सुमारे पस्तीस विश्वस्तांना बरखास्त करावे अशी प्रमुख मागणी करणारा संजय थोबडे यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्याचबरोबर या विश्वस्त मंडळातील नेमणुकांबद्दलचे सर्व बदल अर्ज एक वर्षाच्या आत निकाली काढण्याचे आदेश सोलापूर येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना देण्यात आले असून या आदेशामध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी निरीक्षक नियुक्त करून दर महिन्याला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

गेल्या सुमारे पंधरा वर्षांच्या कालावधीमध्ये धर्मराज कडादी यांचे अध्यक्षतेखाली विश्वस्त मंडळाने या धार्मिक ट्रस्टद्वारे सामाजिक बांधिलकी जपत गोरगरीबांसाठी वैद्यकीय सेवा देणारे हॉस्पिटल, कर्करोग उपचारांसाठी अत्याधुनिक सुविधा, मुलींच्या शिक्षणासाठी स्वतंत्र अभियांत्रिकी महाविद्यालये, सर्व माध्यमांच्या शाळां  तसेच सिद्धेश्वर मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी अनेक सुधारणा केल्या आहेत. पुर्णतः जीर्ण झालेल्या व भाविकांच्या जीवितास धोकादायक असलेल्या जुन्या सभा मंडपाचे नूतनीकरण करणे, तलाव सुधारणा समितीच्या माध्यमातून मंदिराच्या सभोवताली सुमारे पस्तीस एकर क्षेत्रात असलेल्या विस्तीर्ण तलावाचे सुशोभीकरण व डागडुजी करणे, भाविकांसाठी विविध सुविधा करणे अशा मंदिर परिसरातील बांधकाम करताना या कालावधीत प्रसंगानुसार ट्रस्टच्या उद्दिष्टपूर्ती तसेच भाविकांच्या सोयीसाठी काही तातडीचे निर्णय घेवून काम करावे लागले होते. ही कामे करत असताना त्यास आवश्यक असलेल्या परवानगी देताना महानगरपालिकेने दंड आकारला म्हणून विश्वस्त मंडळ बरखास्त करावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली होती. वास्तविक पाहता या कालावधीमध्ये अर्जदार संजय थोबडे हे सुद्धा एक विश्वस्त होते. या सर्व घडामोडींची माहिती त्यांनापण होती. त्यावेळेस त्यांनी कोणतीही हरकत घेतली नव्हती.

परंतु काही कारणास्तव संजय थोबडे यांच्या वैयक्तिक मागणीवरून अध्यक्ष काडादी आणि इतर  विश्वस्तांसोबत वादंग झाले. त्याची परिणीती म्हणून थोबडे यांनी सर्व विश्वस्तांचा अवमानकारक भाषा वापरून अपमान केला. मंदिर परिसरातील ट्रस्टचे कार्यालयात जाऊन आरडाओरडा व शिवीगाळ करून कर्मचाऱ्यांना धमकावून कागदपत्रांचा ताबा घेण्याचा प्रयत्न करून ट्रस्टच्या कामकाजात अडथळा निर्माण केला. त्याबद्दल त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून खुलासा देण्याची संधी दिली असता त्यांनी परत विश्वस्त मंडळ सभेमध्ये गोंधळ घातला. त्यामुळे १८ जून २०१८ रोजी झालेल्या बैठकीमध्ये संजय थोबडे विश्वस्त पदावरून काढण्यात आले. विश्वस्त म्हणून त्यांचे नाव कमी करण्याचा बदल अहवाल सोलापूर धर्मादाय कार्यालयात दाखल झाल्यावर त्याची प्रतिक्रिया म्हणून थोबडे यांनी लगेचच सर्व विश्वस्त मंडळ बरखास्ती साठी पुणे विभागीय धर्मादाय कार्यालयाकडे अर्ज केला होता. सह धर्मादाय आयुक्त राहुल मामू यांनी अर्जातील सर्व मुद्यांवर दाखल कागद पत्रांचे आधारे सविस्तर सुनावणी घेवून आणि दोन्ही बाजूंचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यावर ट्रस्टच्या मिळकतीमधून विश्वस्त मंडळाने स्वतःला काहीही लाभ व्हावा यासाठी कोणताही हेतुपूर्वक निर्णय घेतला नसल्याचा आणि ट्रस्ट मिळकतींचे नुकसान झाले नसल्याचा निष्कर्ष काढून थोबडे यांचा अर्ज फेटाळला. सिद्धेश्वर देवस्थान आणि विश्वस्तांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांचेसह ॲड. विश्वनाथ आळंगे, ॲड. किरण कनाळे, ॲड. माधुरी थोरात व ॲड. श्रद्धा मोरे यांनी काम पाहिले.


कारभार सुरळीत ठेवता येईल
विश्वस्तांवर केवळ दंडात्मक कारवाई करणे हे धर्मादाय आयुक्तांचे कार्य नसून विश्वस्तांनी घेतलेले निर्णय न्यासाच्या हिताचे दृष्टीने योग्य असतील तर धर्मादाय संस्थांचे ‘पालक अधिकारी’ म्हणून त्यातील त्रुटी दूर करण्याचे निर्देश देवून न्यासाचा कारभार सुरळीत ठेवता येईल हे या निकालाने स्पष्ट केले आहे.
– ॲड. शिवराज कदम जहागिरदार
श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि विश्वस्त मंडळातर्फे वकील

Post Views: 56
Previous Post

अन बारामतीची कन्या नगरसेवक झाली, आता उपनगराध्यक्षपद मिळणार का? 

Next Post

भाजपचे माजी परिवहन समिती चेअरमन सोमनाथ तोडकरी परिवाराचा उबाठात प्रवेश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

भाजपचे माजी परिवहन समिती चेअरमन सोमनाथ तोडकरी परिवाराचा उबाठात प्रवेश

ताज्या बातम्या

हॉर्न वाजिवण्याच्या कारणावरून पाच जणांनी केली मारहाण

April 23, 2026

स्त्रीभ्रूणहत्या व अवैध्य गर्भपाताच्या प्रकरणांना आळा बसणार

April 23, 2026

पैशांच्या कारणावरून सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार

April 23, 2026

सात रस्ता येथे दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला

April 23, 2026

अकोल्यामध्ये अंधश्रद्धेचा थरारक वास्तव उघडणारा व्हिडिओ होतोय व्हायरल

April 23, 2026

रईस शाह मौलाना यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे

April 23, 2026

मंठा तालुक्यात नंबर प्लेट नसलेल्या वाळू वाहतूक करणाऱ्या १० वाहनांवर कारवाई

April 23, 2026

स्वतःच्या प्रगतीसाठी आरशाप्रमाणे आत्म – अवलोकन करा

April 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0825416

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697