बार्शी – ताल साधना, सोलापूर या संस्थेतर्फे स्व. दत्तात्रय कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दि. २५ डिसेंबर रोजी स्वतंत्र तबलावादन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत लहान गटातून चि.दिपराज रतिकांत हामणे याने द्वितीय क्रमांक मिळवला. तीन हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे बक्षीसाचे सुरु होते. त्याने पंचम सवरी हा ताल घेऊन तबलावादन केले.
या स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जळगाव, लातूर, पुणे, मुंबई, सोलापूर अशा विविध ठिकाणाहून स्पर्धक सहभागी झाले होते. या तबलावादनासाठी अभिजीत कदम यांनी हार्मोनियमची साथ संगत केली.
या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ तबलावादक पांडुरंग मुखडे व डॉ. सचिन कचोटे यांनी केले. या स्पर्धेसाठी दिपराजला संगीत शिक्षक प्रदीप सुतार यांचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल संगीत विशारद शंकर वाघमारे, संगीत संयोजक भालचंद्र राजगुरु व नागराज वाघमारे यांनी दिपराजचे अभिनंदन केले.

















