सोलापूर – भारत स्काऊट आणि गाईड शहर जिल्हा संस्था यांच्या वतीने बार्शी तालुक्यात चारे येथे 26 ते 29 डिसेंबर 2025 या दरम्यान स्काऊट आणिगाईड मेळावा घेण्यात आला.सन 2024-25 या सालामध्ये आपल्या प्रशालेने सोलापूर जिल्ह्यात खरी कमाई या उपक्रमामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केले आहे.
या मेळाव्यात एकूण सात पदके प्राप्त केली.कलर पार्टी स्पर्धेत प्रथम,शेकोटी स्पर्धेत तृतीय,घोषवादन स्पर्धेत द्वितीय क्रमांक स्काऊटच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केले.तसेच कलर पार्टी स्पर्धेत प्रथम, तंबू सजावट स्पर्धेत द्वितीय,घोषवादन स्पर्धेत द्वितीय,संचालन स्पर्धेत द्वितीय क्रमांक गाईडच्या मुलींनी प्राप्त केले.
75 व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रँड फिनाले डायमंड ज्युबली जांबोरी लखनऊ,उत्तर प्रदेश येथे 19 व्या राष्ट्रीय जांबोरी जिल्हा कॉन्टिजंट लिडर स्काऊट म्हणून राज्यस्तरावर उल्लेखनीय कार्याबद्दल स्काऊट मास्टर परमेश्वर चांदोडे यांचा प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अप्पासाहेब हत्तुरे,संस्थेचे अध्यक्ष सिद्धप्पा वरनाळ,माजी प्राचार्य वैजिनाथ हत्तुरे,मार्गदर्शक धरेप्पा हत्तुरे,प्र. मुख्याध्यापक रमेश दिंडोरे,भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संघटक स्काऊट श्रीधर मोरे,जिल्हा संघटक गाईड अनुसया शिरसाठ यांनी अभिनंदन व कौतुक केले.

















