Tuesday, May 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा शै.कला शिक्षक संघाच्या वतीने जीवनगौरव व आदर्श कलाशिक्षक, कलाप्रेमी पुरस्कार सोहळा

तरुण भारतbyतरुण भारत
January 5, 2026
in solapur
0
0
SHARES
143
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : कला शिक्षक संघ शैक्षणिक कला शिक्षक सोलापूर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला जीवनगौरव पुरस्कार, आदर्श कलाशिक्षक पुरस्कार, कलाप्रेमी पुरस्कार तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षर व रंगभरण स्पर्धांचा बक्षिस वितरणाचा भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कला क्षेत्रातील योगदानाचा गौरव करणे व विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आमदार श्री दत्तात्रय सावंत होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी सांगितले की, “कला शिक्षक हे समाजाच्या सांस्कृतिक विकासाचे शिल्पकार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासात कलेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.”

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दत्तात्रय सावंत उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात कला शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षकांच्या योगदानाचे कौतुक केले. यावेळी शैक्षणिक कला संघटनेच्या वतीने माजी आमदार दत्तात्रय सावंत सरांना कला शिक्षकांशी संबंधित विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

या मागण्यांमध्ये पुढील प्रमुख मुद्द्यांचा समावेश होता –

१) कला शिक्षकांची नियुक्ती करताना विद्यार्थी पट संख्या पूर्वी प्रमाणे विचारात घ्यावी. 

२)  शासकीय रेखाकला परीक्षा,  मूल्यमापन प्रक्रिया व निकाल  याच्या पद्धतीत सुधारणा करणे. 

३) शासकीय रेखाकला परीक्षा – एलिमेंटरी व इंटरमिजिएट   साठी सोलापूरात स्वातंत्र मूल्यमापन केंद्र मिळावे. 

या मागण्यांवर सकारात्मक विचार करून योग्य पाठपुरावा करण्याचे आश्वासन माजी आमदार दत्तात्रय सावंत सरांनी दिले.

कार्यक्रमात कला क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान दिलेल्या ज्येष्ठ कलाशिक्षकांना कला शिक्षक जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जीवनगौरव पुरस्कार, जिल्हास्तरीय आदर्श कला शिक्षक व कलाप्रेमी पुरस्कार  प्राप्त कला शिक्षकांची नावे :

•सोलापूर जिल्ह्यातून ज्ञानेश्वर निवृत्ती कांबळे (सेवानिवृत्त कलाशिक्षक) यांना जीवनगौरव पुरस्कार तर महेश सूर्यकांत छत्रबंद , सुवर्णा मल्लिनाथ भुसने , शोभा सोमनगौडा बिरादार , नागराज चंद्रकांत रमणशेटटी यांना जिल्हास्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार २०२६ व नंदकुमार चंद्राम विजापूरे, विजया अजिंक्य मोरे ,  गीता तायप्पा पवार , सुनिता किसन घाडगे  ,मधुरा मिलिंद छत्रे  यांना कलाप्रेमी पुरस्कार २०२६ देऊन गौरविण्यात आले.

सदर कार्यक्रम, मा. दत्तात्रय सावंत, (माजी शिक्षक आमदार, विभाग पुणे.), मा. पंडित भिमण्णा जाधव, (आंतरराष्ट्रीय सुंद्रीवादक) प्राचार्य राम अप्पाराव ढाले, (एस. व्ही.सी.एस. हायस्कूल, भवानी पेठ, सोलापूर), मा. शांतय्या गुरय्या स्वामी, (सचिव, श्री बृहन्मठ होटगी संस्था, सोलापूर) मा. सुधीर बसवंत भरले,   प्राचार्य नितीन झाडबुके, (बसवेश्वर माध्य. व उच्च माध्य. विद्यालय निंबर्गी), मा. शेरशहा डोंगरी, (राज्याध्यक्ष, अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघ) जिल्हाध्यक्ष शशिकांत सदाफुले , सचिव  संतोष धारेराव शांताप्पा काळे, अध्यक्ष शेरशहा डोंगरी सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या हस्ताक्षर व रंगभरण स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी, पालक व कलाप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सदर उपक्रमामुळे कला शिक्षणाला चालना मिळून कला शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. 

   कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  जगदीश बिडकर,  विजयश्री गंगदे, सचिन व्हनमाने,  संदिप पोतदार,  नागनाथ गावडे,  सचिन कोरे, पंडित स्वामी, संदिप  स्वामी, शैलेश स्वामी, आकाश नंदुर, सिद्धाराम नालवार, मोहन कांबळे,राजा  उबरजे राजेंद्र यंदे,  योगेश हिरेमठ, मदगोंडा बिराजदार,  षण्मुखानंद दाते,दिलीप दीक्षित,

सुवर्णा भुसने, विजयश्री बिराजदार,  मधुरा देशपांडे, स्वाती साठे, जगदेवी वर्मा,  स्नेहल गुंगे,  सोमशंकर म्हेत्रे, महालिंगप्पा सोमेश्वर  नरेंद्र नालवार, शशिकांत मोटगी,   अनिल रॉय,  तेजप्पा बिराजदार  शै. कला शिक्षक संघ सोलापूरचे सर्व कार्यकारणी, सदस्य सर्वांचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश कल्लाप्पा साळुंखे यांनी केले तर शेवटी आभार शांतप्पा काळे यांनी मांडले.

Post Views: 298
Previous Post

अमित ठाकरेंनी सरवदे कुटुंबीयांची सांत्वन्पर घेतली भेट

Next Post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या ५ तासांत अटकेत

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या ५ तासांत अटकेत

ताज्या बातम्या

भाजपच्या विजयाचा हिंगोलीत कार्यकर्त्यांकडून जल्लोष

May 5, 2026

डंपर आणि बसचा भीषण अपघात दोघे जागीच ठार

May 5, 2026

लाईट बिल मागण्यास गेलेल्या तरुणास बेदम मारहाण

May 5, 2026

उष्णतेमुळे पेटला कचऱ्याचा डेपो

May 5, 2026

त्या चिमुकलीसाठी उजळल्या शेकडो मेणबत्त्या

May 5, 2026

कुठंतरी न्याय संस्था चुकतेय आमदार विजयकुमार देशमुख

May 5, 2026
जनमेजयराजेच्या वृक्ष प्रेमामुळे सोलापुर रस्त्यावर बहरली वृक्ष

जनमेजयराजेच्या वृक्ष प्रेमामुळे सोलापुर रस्त्यावर बहरली वृक्ष

May 5, 2026
गुणवंत विद्यार्थी हेच संस्थेचे वैभव – प्रा.नीलिमा कुलकर्णी

गुणवंत विद्यार्थी हेच संस्थेचे वैभव – प्रा.नीलिमा कुलकर्णी

May 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0847371

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697