सोलापूर – सोलापूर शहर शालेय कुस्ती स्पर्धेत ज.रा. चंडक प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक दशरथ गुरव, नफीसा शेख यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंची करमाळा फुरसुंगी येथे होणाऱ्या पुणे विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सचिन ठोकळ, सचिव शिल्पाताई ठोकळ, मुख्याध्यापक मोहनराव घोडके यांनी सर्व खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विविध गटातील अजिंक्यपद मिळवलेले व विभागीय स्पर्धेसाठी निवडलेले मल्ल : सतरा वर्षे वयोगट फ्री स्टाईल कुस्ती: ओंकार भोळे ६० किलो, पार्थ शिंदे ८६ किलो, प्रतीक चव्हाण ७१ किलो.
एकोणीस वर्षे वयोगट : स्वराज चौगुले ७० किलो, प्रशांत चव्हाण ७९ किलो, परमेश्वर चौगुले ७१ किलो ग्रीको रोमन.






















