सोलापूर – डोणगाव रोड येथील श्रीकृष्ण कुस्ती केंद्र येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूलच्या अजिंक्य भोसले याने ग्रीक रोमन या प्रकारात अजिंक्यपद पटकाविले. या कामगिरीवर त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच सोहम मारकड याने फ्री स्टाईल या प्रकारात उपविजयी ठरला. या विद्यार्थ्याना क्रीडा शिक्षक प्रमोद म्हेत्रे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे कमिटी अध्यक्ष पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त वृष्टी जैन, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील , आय.एम.एस. ग्रुप ऑफ स्कूलचे सचिव अमोल जोशी , श्री साई महिला प्रतिष्ठानच्या सचिवा सायली जोशी , शाळा समन्वयक ममता बसवंती व मुख्याध्यापिका स्वाती कारंडे यांनी अभिनंदन केले.
——






















