जेऊर – करमाळा तालुक्यातील शेळके वस्ती दहिगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी दहिगाव सोसायटीचे माजी चेअरमन अनुराधा शेळके या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून दहिगाव गावच्या लोकनियुक्त सरपंच प्रियंका ताई गलांडे या उपस्थित होत्या शेळके वस्ती वरील सर्व माता किशोरवयीन बालिका व पालक वर्ग बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते.
यावेळी शाळेतील विद्यार्थी अंकिता पाडुळे तनुज पोरे ज्ञानेश्वरी पाडुळे या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे महत्त्व सांगितले या दिवशी काही मुलींनी साड्या घालत सावित्रीबाईची भूमिका केली होती महिलांसाठी व मुलींसाठी संगीत खुर्ची उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्योतीराम पाडुळे व उपाध्यक्ष लक्ष्मण वाघमोडे यांच्याकडून मुलांसाठी खाऊ वाटप व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विजय राऊत सर यांनी केले तर आभार प्रदर्शन उर्मिला गंभीरे मॅडम यांनी मानले यावेळी ग्रामपंचायत सदस्या मनीषा शेंडगे स्वाती शेळके उज्वला गलांडे मेघा शेळके अनिता जाधव अश्विनीताई वाघमोडे सीमा पाडुळे दिपाली पाडुळे वैजयंती शेळके साधना पाडुळे सुषमा जाधव सुवर्णा पाडुळे शितल वाघमोडे मनीषा कोंडलकर अंगणवाडी ताई मोटे मॅडम व शिंदे मॅडम उपस्थित होत्या

























