पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव हे गाव आसपासच्या दहा _ बारा खेडेगावासाठी मोठी बाजारपेठ असणारे पंढरपूर _ सातारा महामार्गावरील मुख्य बाजारपेठ असणारे गाव आहे .याठिकाणी बाजारपेठ, बसस्थानकावर राञ _ दिवस रहदारी असते.याठिकाणी सतत चोऱ्या होतात .मंगळवारी भर दुपारी याठिकाणी पाच ते सहा शेळ्या चोरीला गेल्या आहेत. याठिकाणी चोरी झाली की सीसीटीव्ही चा प्रश्न अनेक वर्षांपासून ऐरणीवर येतो .कारण पिलीव येथील बचेरी चौक, अहल्यादेवी चौक,आंधळकर चौक, महाराणा प्रताप चौक, वेशीजवळ, साठेनगर येथील दोन्ही चौकात, व बायपास व जनावरांचा दवाखाना अश्या मुख्य ठिकाणी चौकात जर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले तर चोरीचा छडा लावणे खुप सोपे होईल. तसेच पिलीव येथे होणाऱ्या चोऱ्यावर नक्कीच पायबंद बसेल पण हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे कसे यासाठी येणारा खर्च नक्की कोण करणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.यापुर्वी अनेकवेळा व्यापारी व काही समाजसेवक यांच्यामध्ये याबाबत बैठक झाली होती.व्यापारी तसेच अनेक समाजसेवी संस्था यासाठी मदत करण्याच्या भुमिकेत आहेत.पण यामध्ये पुढे येऊन काम करण्यास कोणच तयार होईना अशी परिस्थीती आहे .यामुळेच हे काम अनेक वर्षांपासून पेंडींग आहे .या सर्व ठिकाणी जर सीसीटीव्ही बसविले तर पिलीव परीसरात होणाऱ्या चोऱ्यावर पायबंद नक्कीच बसणार आहे.लोकसहभागातून हे काम शक्य आहे फक्त कोणीतरी पुढे येऊन हे काम हाती घेणे आवश्यक आहे.सार्वजनिक मंडळे, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनी ह्या महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे. सीसीटीव्ही बसविलयाशिवाय पिलीव येथील चोऱ्यांचा छडा लावणे शक्य नाही . चौकट _ पिलीव गावात चौका चौकात सीसीटीव्ही बसविल्यास चोऱ्यावर पायबंद घातला जाईल तसेच चोऱ्यांचा छडा लावणे शक्य होईल. _ स्वरुप शिंदे ,हवालदार पिलीव दूरक्षेत्र. चौकट _ यांविषयी भाजपचे जिल्ह्य अध्यक्ष तथा पंचायत समीती सदस्य शिवराज पुकळे यांना सीसीटीव्ही बसविणयाविषयी बोललो असता आपण नक्कीच यासाठी प्रयत्न करु असे सांगीतले.



















