Wednesday, August 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पाणीपुरवठा योजनेत शहरातील कोणताही भाग वंचित राहू नये : महापौर कोंडयाल

तरुण भारतbyतरुण भारत
June 19, 2026
in solapur
0
पाणीपुरवठा योजनेत शहरातील कोणताही भाग वंचित राहू नये : महापौर कोंडयाल
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर :  शहरासाठी प्रस्तावित १३७८ कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक पाणीपुरवठा प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान शहरातील कोणताही भाग वंचित राहू नये, सर्व भागांना समान व नियोजनबद्ध पाणीपुरवठा मिळावा तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया तातडीने राबवून कामांना गती देण्याचे आदेशही महापौर विनायक कोंडयाल यांनी दिले.
         महाराष्ट्र शहरी पाणीपुरवठा, स्वच्छता आणि पुनर्वापर कार्यक्रमाच्या अनुषंगाने तसेच सोलापूर शहरासाठी प्रस्तावित १३७८ कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे महापौर  विनायक  कोंडयाल यांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय आढावा बैठका पार पडल्या. आज झोन क्रमांक एक आणि दोन ची बैठक झाली. या बैठकांमध्ये उपस्थित नगरसेवकांनी आपल्या सूचना मांडल्या.महापौर विनायक  कोंडयाल यांनी उपस्थित नगरसेवकांच्या सूचना जाणून घेतल्या. यावेळी नगरसेवकांनी विविध तांत्रिक प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
         या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, नगरसेविका तथा अध्यक्ष रोहिणी तडवळकर, नगरसेवक अनंत जाधव, नगरसेवक बिजू प्रधाने,नगरसेवक समाधान आवळे , नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेविका श्रद्धा पवार, नगरसेविका अलका भवर, नगरसेवक विनायक विटकर, नगरसेवक संजय कोळी, नगरसेवक अविनाश पाटील,नगरसेवक राजू पाटील, नगरसेवक प्रा. नारायण बनसोडे, नगरसेवक गौतम कसबे, नगरसेविका राजश्री कणके, नगरसेविका पूनम काशीद,ज्ञानेश्वर कारभारी,दत्तात्रय बडगु, किरण पवार सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, विभागीय अधिकारी-१ चे सुनीता हिबारे,विभागीय अधिकारी -२ चे सरकाझी सहाय्यक अभियंता शाम कन्ना राउफ शेख,एच मुजावर, समीर जोशी, शशिकांत भुदे किशोर पत्तेवाले, अमर फारूक बागवान, मधुकर साळुंखे, सुचिता अमेणगी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
          सकाळी झालेल्या बैठकीत विभागीय क्रमांक १ मधील प्रभागा 4,5,7 येथील नगरसेवक यावेळी उपस्थिती होते.१३७८ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करणे, प्रत्येक नागरिकापर्यंत समान व पुरेसा पाणीपुरवठा पोहोचविणे, पाण्याची गळती रोखणे, वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे तसेच भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.तसेच संबंधित प्रभागांमध्ये प्रस्तावित पाण्याच्या टाक्या, नव्याने उभारण्यात येणाऱ्या जलकुंभांची ठिकाणे, जुन्या व जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाक्यांचे पुनर्बांधणी अथवा बदल, नवीन जलवाहिन्या (पाईपलाईन), विद्यमान पाईपलाईनचे मजबुतीकरण व विस्तार, वितरण नेटवर्कमधील सुधारणा यासंदर्भातील सविस्तर माहिती नगरसेवकांना सादरीकरणाद्वारे देण्यात आली.                    प्रभागनिहाय नियोजित कामांचा आराखडा, त्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक माहिती आणि कामांच्या अंमलबजावणीची रूपरेषा यावरही चर्चा करण्यात आली.
            यानंतर झोन क्रमांक २ अंतर्गत प्रभाग क्रमांक १, २ व ३ मधील नगरसेवकांची  बैठक घेऊन त्यांच्या भागातील पाणीपुरवठ्याशी संबंधित समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागांतील विविध बाबी महापौरांच्या निदर्शनास आणून दिल्या.  बैठकीत १३७८ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन, तांत्रिक बाबी आणि पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या योजनेमुळे सोलापूर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा होऊन नागरिकांना दीर्घकालीन, शाश्वत व समान पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
नगरसेवकांनी उपस्थित केल्या
 आराखड्याबाबत अनेक तांत्रिक शंका
 नव्या झोनिंग पद्धतीमुळे पाणीपुरवठा क्षेत्रांचे विभाजन करण्यात येणार असून त्यामुळे कमी क्षमतेच्या टाकीतूनही नियोजनबद्ध आणि अखंडित पाणीपुरवठा शक्य होईल. अवंती नगर आणि एबीडी क्षेत्रातील विविध भागांना स्वतंत्र जलसाठा केंद्रांमधून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.मात्र बैठकीदरम्यान नगरसेवकांनी प्रस्तावित आराखड्याबाबत अनेक तांत्रिक शंका उपस्थित केल्या. विद्यमान टाक्यांचा वापर कायम राहणार का, नवीन टाक्यांमुळे साठवण क्षमतेत वाढ  होणार का, तसेच उंच आणि सखल भागांमध्ये समान व सुरळीत पाणीपुरवठा कसा केला जाणार याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.यशनगर, वसंत विहार आणि अवंती नगर परिसरातील पाइपलाइन जोडणी, नवीन लाईनचे मार्ग, पाण्याचा दाब आणि वितरण व्यवस्था याबाबतही नगरसेवकांनी चिंता व्यक्त केली.
प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून
अंतिम नियोजन करण्याची मागणी
 काही लोकप्रतिनिधींनी विद्यमान आराखडा जुन्या नकाशांवर आधारित असल्याचा मुद्दा उपस्थित करत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अंतिम नियोजन करण्याची मागणी केली. यावर अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या बाबींचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच पाणीपुरवठा योजनेत पारदर्शकता राखून नागरिकांच्या सूचना आणि स्थानिक गरजांनुसार आवश्यक बदल करण्याची तयारी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.बैठकीत आगामी काळात प्रत्यक्ष स्थळ पाहणी, तांत्रिक सादरीकरण आणि लोकप्रतिनिधींच्या सूचनांनंतर अंतिम आराखडा निश्चित करण्यात येणार आहे.
————-
Post Views: 290
Previous Post

इंग्लिश स्कूल प्रशालेची स्वर्णश्री पाटील पुनर्मूल्यांकनानंतर दहावी बोर्ड परीक्षेत राज्यात प्रथम.

Next Post

१९ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट संघ निवड चाचणी २७ व २८ जून रोजी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

१९ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट संघ निवड चाचणी २७ व २८ जून रोजी

ताज्या बातम्या

सोलापुरात डॉक्टरांनी केले निदर्शन

August 5, 2026

सोलापूर तरुण भारत – Short Updates

August 5, 2026

सुनेत्रा पवार म्हणाल्या चोख उत्तर देईन

August 5, 2026

महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याबद्दल बोलले फडणवीस

August 5, 2026

गप्पा पडल्या महागात पहा पुढे झाले काय

August 5, 2026

बांगलादेश बॉर्डरवर भारतीय जवानाने थेट तंबी दिली

August 5, 2026

आ देशमुख म्हणाले आपत्ती व्यवस्थापनाचे नक्की ऐका #solapur #getmoreviews #getrich

August 4, 2026

Gen z चा मुख्यमंत्र्या सोबत नारा #marathinews #maharashtranews #getmoreviews #getmoresubscribers

August 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1028271

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!