Friday, June 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तिर्थक्षेत्र पंढरपूरच्या विकासासाठी राज्य सरकारचा महत्वपुर्ण निर्णय

तरुण भारतbyतरुण भारत
June 19, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. बहुचर्चित ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखड्या’ला अखेर राज्य शासनाच्या नियोजन विभागाने तब्बल ३९९३.९० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे. या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय गुरुवार, दि.१८ जून रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीमप्रोजक्ट असलेल्या पंढरपूर काँरिडोरला अखेर मुख्यमंत्र्यांच्या  अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय शिखर समितीने दिलेल्या मंजुरीनंतर हा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. हा विकास आराखडा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षापासून प्रत्यक्षात अंमलात येणार आहे. एकुण ३९९३.९० कोटी रुपयांच्या या भव्य आराखड्याची तीन मुख्य विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यात पंढरपूर काँरिडाँर विकास एकुण ५९७ कोटी रुपये, वारकऱ्यांसाठी समग्र सोयीसुविधांचा विकास २८८.६६ कोटी रुपये, मंदिर परिसर विकास – काँरिडोर निर्माण २५४.६१ कोटी रुपये, पुरातन मंदिर व मठांचे जतन व संवर्धन ३६ कोटी रुपये. या बरोबरच पंढरपूर शहर विकास नियोजन एकूण १३८७.९१ कोटी रुपये, शहर सुशोभिकरण – ४८०.५० कोटी रुपये, नदी घाटांचा विकास व सुशोभिकरण – ४४८.३९ कोटी रुपये, नगर प्रदक्षिणा मार्गाचा विकास- १६२.९४ कोटी रुपये, शहरास जोडणारे रस्ते व पूल- १२७. ६० कोटी रुपये, पालखी तळांचा विकास- १००.०० कोटी रुपये, वाहनतळ व व्यापारी संकुल- ६८.४८ कोटी रुपये, पुनर्वसन खर्च व बाधित इमारत मोबदला – एकूण २०२६.७२ कोटी रुपये, भूसंपादन आणि पुनर्वसन खर्च- १७९२.७२ कोटी रुपये, बाधित इमारतींचा – मोबदला – २३४.०० कोटी रुपये अशा बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
या विकास आराखड्यातून निर्माण होणाऱ्या भाविकांच्या सुविधा आणि पर्यटनस्थळ सर्वसामान्य नागरिकांसाठी नेहमी खुले राहील, अशी अट देवस्थान सोबतच्या करारामध्ये समाविष्ट केली जाणार आहे. या भव्य प्रकल्पामुळे आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी वारीसाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुकर होणार असून, पंढरपूर शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे.
——————
( जिल्हाधिकाऱ्यांवर संनियंत्रण अधिकाऱ्याची जबाबदारी)
या संपूर्ण प्रकल्पासाठी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना ‘संनियंत्रण अधिकारी’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रकल्पाच्या संनियंत्रणासाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ‘जिल्हास्तरीय समिती’ तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘कार्यकारी समिती’ गठीत करण्यात आली आहे. कामामध्ये कोणत्याही प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही आणि केवळ मंजूर कामांवरच निधी खर्च होईल, याची संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर असेल.
———————–
चौकट : ( ऐतिहासिक व पुरातत्त्वीय वारसा जपणार )
शासन निर्णयानुसार, पंढरपूरमधील ऐतिहासिक वास्तुंचे काम करताना त्यांची मूळ शैली जपली जाणे अनिवार्य आहे. यासाठी भारतीय पुरातत्त्व विभाग आणि राज्य पुरातत्त्व विभागासारख्या तज्ज्ञ संस्थांकडूनच ही कामे करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मंदिर किंवा विश्वस्त संस्थेच्या जागेवर काम सुरू करण्यापूर्वी त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र आणि पुढील देखभाल – दुरुस्तीबाबतचा करारनामा करणे देखील बंधनकारक राहणार आहे.
——————-
चौकट : ( कालमर्यादेबाबत अहवाल सादर करणे बंधनकारक)
भाविकांसाठी दर्जेदार सुविधा,सुधारित वाहतूक व्यवस्था, व्यापारी संकुले आणि पर्यटन पायाभूत सुविधांमुळे स्थानिक रोजगार निर्मितीला गती मिळणार आहे. या बरोबरच बाधितांना पर्यायी व्यावसायिक संधी देखील उपलब्ध करुन देण्याचाही समावेश आराखड्यात करण्यात आला आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी चालू वर्षापासून सुरु होणार असून निधी खर्च, कामाची गुणवत्ता आणि कालमर्यादेबाबत शासनाकडे नियमित अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
Post Views: 16
Previous Post

आयटीआय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी माजी आमदार संजय केनेकर यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा  

Next Post

खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

पाणीपुरवठा योजनेत शहरातील कोणताही भाग वंचित राहू नये : महापौर कोंडयाल

पाणीपुरवठा योजनेत शहरातील कोणताही भाग वंचित राहू नये : महापौर कोंडयाल

June 19, 2026
इंग्लिश स्कूल प्रशालेची स्वर्णश्री पाटील पुनर्मूल्यांकनानंतर दहावी बोर्ड परीक्षेत राज्यात प्रथम.

इंग्लिश स्कूल प्रशालेची स्वर्णश्री पाटील पुनर्मूल्यांकनानंतर दहावी बोर्ड परीक्षेत राज्यात प्रथम.

June 19, 2026

खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल

June 19, 2026

तिर्थक्षेत्र पंढरपूरच्या विकासासाठी राज्य सरकारचा महत्वपुर्ण निर्णय

June 19, 2026

आयटीआय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी माजी आमदार संजय केनेकर यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा  

June 19, 2026
ब्रम्हपुरीची रिल स्टार रोहिणी पाराध्ये हिला आखेर  तब्बल 23 दिवसानंतर पोलिसांनी दिला न्याय

ब्रम्हपुरीची रिल स्टार रोहिणी पाराध्ये हिला आखेर  तब्बल 23 दिवसानंतर पोलिसांनी दिला न्याय

June 19, 2026
शिवसेना वर्धापन दिन निमित्य महारती

शिवसेना वर्धापन दिन निमित्य महारती

June 19, 2026

सीसीटीव्ही चा प्रश्न ऐरणीवर, चोरीचा छडा लावण्याचे पोलीस प्रशासनापुढे मोठे आव्हान?

June 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0920394

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697