Wednesday, July 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मंद्रूप जिल्हा परिषद गट सुरक्षित राखण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्याची धावपळ

तरुण भारतbyतरुण भारत
January 18, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या मंद्रूप जिल्हा परिषद गट राष्र्टवादीच्या ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्याची धावपळ सुरू असल्याचे दिसून येते .


मंद्रूप जिल्हा परिषद गट राष्र्टवादीकडे ठेऊन इतर जिल्हा परिषद गट मित्रपक्षांना देण्याचा प्रयत्न सुरू असुन त्यासाठी काॅंग्रेस, शिवसेना व भाजपाच्या नेत्याशी चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र काँग्रेस सह इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून  स्वतंत्र लढण्याचा  आग्रह असल्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाची आघाडी व युतीचा प्रस्ताव फेटाळणार असल्याचे कार्यकर्त्यांमधून सांगण्यात येत आहे. त्यामुळे मंद्रूपच्या राष्र्टवादीच्या नेत्याची धावपळ व्यर्थ ठरणार का ? हे पाहावे लागणार आहे.


  मंद्रूपमधील राष्र्टवादीच्या नेत्यानी पक्ष निरीक्षकांशिवाय युती व आघाडीची चर्चा सुरू केल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. राष्र्टवादी काॅंग्रेस अजित पवार पक्षाचे सहनिरीक्षक डाॅ. धवलसिंह मोहीते पाटील यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निवडणूकी संदर्भात  निर्णय घेणार असल्याचे सांगितला आहे. मात्र तालुक्यातील राष्र्टवादीचे नेते काॅंग्रेस, शिवसेना व भाजपाबरोबर युतीबाबत चर्चा करीत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
  सोलापूर महानगरपालिका निवडणूकीत वैभव हत्तुरे वगळता एकही नगरसेवक निवडून आला नाही. त्यामुळे सत्ताधारी राष्र्टवादी काॅंग्रेसची नाचक्की झाली असून जिल्ह्यातील नेते जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणूकीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे एका पदाधिकार्‍याने सांगीतले. सर्वत्र भाजपाची लाट असून या लाटेमध्ये राष्र्टवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे दक्षिणमधील मंद्रूपमध्ये प्राबाल्य होते. गत निवडणूकीत राष्र्टवादीच्या विद्युलता कोरे यांनी भाजपाच्या सविता मेंडगुदले यांचा ९९ मतांनी पराभव करून गड ताब्यात ठेवले होते. मात्र यावेळी राष्र्टवादीचे विभाजन झाले असून व राष्र्टवादीचे नेते गोपाळराव कोरे यांचे निधन झाल्याने हा मतदारसंघ नेतृत्वाला पोरका झाला आहे.

या मतदारसंघात राष्र्टवादीचे नेते शरद पवार यांना मानणारा बारा बलुतेदारांचा वर्ग असल्यामुळे यावेळी ही निवडणूक राष्र्टवादी काॅंग्रेस अजीत पवार गटासाठी अवघड जाणार आहे. त्यामुळे मंद्रूपमधील नेत्याकडून काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अमर पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली असून भाजपाच्या नेत्याबरोबरही गुप्त बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. काॅंग्रेसचे कार्यकर्ते व नेते दक्षिणमध्ये स्वतंत्र निवडणूक लढविणार असल्याचे सांगत असल्याने काॅंग्रेससोबत आघाडी होणार नाही. तर शिवसेना नेत्यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केली नसल्याने राष्र्टवादी नेत्याची धावपळ व्यर्थ ठरणार का ? हे पाहावे लागणार आहे.


   मंद्रूप जिल्हा परीषद व पंचायत समिती गण ताब्यात ठेवण्यासाठी या नेत्याची धावपळ सुरू आहे. मात्र या भागात अॅंटी इन्कम्बन्सी असल्याने त्याचा फटका राष्र्टवादीच्या उमेदवारीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावात व मतदारसंघात एकही पदाधिकारी तयार करण्यात आले नसल्याने कार्यकर्त्यां मधून नाराजी आहे. शिवाय गावातील खोळंबलेल्या विकासकामांमुळे मतदारांमधून उघड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. म्हणून डाॅ. धवलसिंह मोहीते पाटील यांच्या समर्थकांकडून उर्वशीराजे मोहीते पाटील यांनी  निवडणूक लढविण्याची मागणी होत आहे.

राष्र्टवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष पाटील यांनी वरिष्ठांच्या आदेशांचे पालन म्हणून युती व आघाडीबाबत चर्चा केल्याचे सांगत असले तरी राष्र्टवादीचा प्राबाल्य असलेल्या मंद्रूप जिल्हा परिषद गट ताब्यात ठेवणे, हा त्यामागील उद्देश्य असल्याची चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीतील पुर्वानुभव पाहता मतदारसंघातील इतर गावातूनही नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे भाजपाच्या लाटेत राष्र्टवादीच्या घड्याळाची टिकटिक सुरू राहणार कि घड्याळ बंद पडणार ? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. 

Post Views: 71
Previous Post

सोलापूर महापालिकेत सर्वात कमी वयाच्या नगरसेविका होण्याचा मान पूजा वाडेकर यांना !

Next Post

डांबुन ठेवलेल्या १० ऊसतोड मजुरांची करकंब पोलिसांकडून सुटका

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

डांबुन ठेवलेल्या १० ऊसतोड मजुरांची करकंब पोलिसांकडून सुटका

ताज्या बातम्या

मनपा मुलांची केंद्र शाळा 9 मध्ये शालेय साहित्याचे वाटप

मनपा मुलांची केंद्र शाळा 9 मध्ये शालेय साहित्याचे वाटप

July 1, 2026
सोलापूर महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

सोलापूर महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

July 1, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 1, 2026

वालचंद’चे वरिष्ठ लिपिक भगवान खुरगांवकर यांचा सन्मान 

July 1, 2026
“वालचंद कनिष्ठ महाविद्यालय अकरावी  प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न “

“वालचंद कनिष्ठ महाविद्यालय अकरावी  प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न “

July 1, 2026
डॉ. देशपांडे संघाचा हबीब संघावर  दिमाखदार विजय

डॉ. देशपांडे संघाचा हबीब संघावर  दिमाखदार विजय

July 1, 2026
पद्मशाली शिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

पद्मशाली शिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

July 1, 2026

महापालिका भंगार चोरी प्रकरणात मोठी कारवाई

July 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0951969

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697