मंगळवेढा – प्रदीप खांडेकर यांची भोसे जि.प. गटात उमेदवारी निश्चित झाली असून, हणमंत दुधाळ व हुलजंती व गटाचा प्रश्न सुटला. या समझोत्याने मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील भाजपची पकड मजबूत झाली आहे. आमदार समाधान आवताडेंचा ‘एका दगडात दोन पक्षी’ असा डाव साधला असलेचे दिसून येत आह.आ. समाधान आवताडे यांनी सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत (२०२६) मंगळवेढा तालुक्यातील भोसे गटासाठी अशा रीतीने रणनीती आखली की, एकाच प्रयत्नाने दोन पक्षी मारले गेले.
प्रदीप खांडेकर व हणमंत दुधाळ यांच्यातील अंतर्गत लढत टाळून खांडेकर यांना भोसे जि.प. गटाची उमेदवारी देण्यात आली. यामुळे हुलजंती व भोसे जि.प. गटाचा प्रश्नही मिटला आहेभोसे गटात प्रदीप खांडेकर व हणमंत दुधाळ हे दोन प्रमुख नेते एकमेकांविरुद्ध उभे राहणार होते. दोनच दिवसापुर्वी दुधाळ काँग्रेस आय पक्षातुन मुलाखत दिली होती.दोघेही जि.प. गटासाठी दावा करत असल्याने गटबाजी होण्याची शक्यता होती. आवताडे यांनी हस्तक्षेप करून खांडेकर यांना भोसे जि.प. निश्चित केले, तर दुधाळ यांना हुलजंतीव गटाची जबाबदारी दिली. हुलजंती गट महिला आरक्षण असल्याने दुधाळ यांच्या पत्नीस भाजपकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
अंतर्गत लढत टळल्याने भाजपचा मंगळवेढा तालुक्यातील गट एकत्र राहिला.दोन गटांचा लाभ: भोसे व हुलजंतीव हे दोन्ही गट भाजपकडे आले.
विरोधकांना धक्का बसला असुन भोसे गट व इतर विरोधकांना भाजपान आव्हान केले आहे.मंगळवेढ्यातील सध्याची स्थिती पाहता मंगळवेढा तालुक्यात भाजपचे वर्चस्व आहे. गेल्या निवडणुकांत आवताडे गटाने दोन जि.प. जागा जिंकल्या. नगरपरिषदेत धक्का बसला तरी जि.प. निवडणुकीत सत्ता राखण्याची आशा आहे. ओबीसी आरक्षणानंतर गट वाढले असून नवीन तरुणांना संधी मिळणार आहे.
जि.प. निवडणुकी साठी भालके गट व शिवानंद पाटील यांची समविचारी आघाडी विरोधकातून असणार आहे तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी भोसे गटात तडजोड करणार नसलेचे दिसत आहे.



















