सांगोला – सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा २०२५-२६ मध्ये अनुक्रमे २० आणि ३७ अशा एकूण ५७ विद्यार्थ्यांनी ए ग्रेड संपादन केली आहे. एलिमेंटरी बी ग्रेडमध्ये २० तर सी ग्रेडमध्ये ४ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. तसेच इंटरमिजिएट बी ग्रेडमध्ये ५ तर सी ग्रेडमध्ये ४ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. दोन्ही परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना एलिमेंटरी परीक्षेसाठी समाधान शिंदे व इंटरमिजिएट परीक्षेसाठी अमोल उकळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापक चिंतामणी देशपांडे, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, उत्तम सरगर, काकासाहेब नरुटे तसेच परीक्षा विभाग प्रमुख नामदेव खंडागळे व सिताराम राऊत यांनी अभिनंदन केले.

















