कळंब : जिथे कष्ट, श्रम व मनोभावनेने जिद्द बाळगून परिश्रम केले जाते, त्यालाच त्याचे फळ मिळते ते म्हणजे कळंबचे भूमिपुत्र गोकुळ आशा विष्णुदास भराडिया (वय ३२) यांनी आपल्या जीवनप्रवासातून सिद्ध करून दाखवले आहे.कोणताही शासकीय वारसा, राजकीय शिफारस किंवा आर्थिक पाठबळ नसतानाही केवळ सेल्फ स्टडी,कठोर परिश्रम,जिद्द आणि चिकाटी या भांडवलावर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत पुन्हा एकदा पहिल्यांदाच प्रयत्नात 2 6 वी रॅंक मिळवत घवघवीत यश मिळवत सहाय्यक विक्रीकर आयुक्त (जी.एस.टी. विभाग),श्रेणी–१ हे प्रतिष्ठेचे पद पटकावले आहे.
वडिलोपार्जित वडील कळंब येथे आडत दुकान चालवत तेही तोट्यात चालल्याने बंद सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या गोकुळ भराडिया यांचा प्रवास सोपा नव्हता.अभ्यासासाठी कोणतीही कोचिंग क्लासेसची मदत न घेता शहरातीलच सावित्रीबाई फुले विद्यालयात पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण घेतले. या यशानंतर पुढे अकरावीला राजश्री शाहू महाविद्यालयात प्रवेश मिळाला. या यशानंतर त्यांनी नियोजनबद्ध अभ्यास,संदर्भग्रंथांचे वाचन, मागील प्रश्नपत्रिकांचा सखोल सराव आणि सातत्यपूर्ण पुनरावृत्ती यावर भर दिले व मनाशी जिद्द बाळगुण बारावीत घवघवीत यश संपादन केले. पुढे त्याला शैक्षणिकदृष्ट्या ते अत्यंत गुणवंत असुन शिक्षण घेण्याची संधी पुणे येथील गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,पुणे येथून बी.टेक (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) ही पदवी संपादन करण्याची संधी मिळाली.
याच संधीचा जोरावर अथक परिश्रम घेत त्यांनी २०२० साली एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात 22 वी रॅंक मिळवण्यात यशस्वी झाले. नायब तहसीलदार पदाची नियुक्ती मिळवली.
नायब तहसीलदार म्हणून सोलापूर येथे सेवा बजावल्यानंतर,सध्या ते कळंब,जिल्हा धाराशिव येथील तहसील कार्यालयात कार्यरत होते. प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी सांभाळत असतानाच, मर्यादित वेळेत त्यांनी पुन्हा एकदा एमपीएससीचा अभ्यास सुरू ठेवला. दिवसाचे ठराविक तास, शिस्तबद्ध वेळापत्रक आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी ही दुसरी मोठी प्रशासकीय झेप घेतली आहे.
नंतरही प्रशासकीय सेवेकडे वळण्याचा त्यांचा निर्णय समाजाभिमुख सेवेची तळमळ दर्शवतो.
अत्यंत शांत,प्रेमळ,संयमी आणि मृदू स्वभावाचे गोकुळ भराडिया हे सहकारी व नागरिकांमध्ये आदराने ओळखले जातात.आपल्या यशाबाबत ते नेहमीच कुटुंबीय, गुरुजन आणि स्वतःच्या परिश्रमांचे श्रेय देतात.यशानंतर त्यांनी नवतरुणांना मार्गदर्शन करताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आजच्या तरुणांनी मोबाईल, फेसबुक, इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर तसेच गर्लफ्रेंड–बॉयफ्रेंडच्या आभासी दुनियेत वेळ वाया घालवू नये.ध्येय निश्चित करून मोबाईलवर नियंत्रण ठेवले, तर यश नक्कीच मिळते.” असे आवाहन यावेळी प्रतिनिधी परवेज मुल्ला यांच्याशी बोलताना व्यक्त केले.
कळंब तालुक्याच्या मातीने घडवलेला हा होतकरू अधिकारी आज राज्याच्या महसूल व कर प्रशासनात महत्त्वाची जबाबदारी स्वीकारत असून,गोकुळ भराडिया यांची यशोगाथा ग्रामीण भागातील असंख्य युवकांसाठी आशेचा किरण आणि प्रेरणेचा दीपस्तंभ ठरत आहे.



















