Saturday, April 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भाजपचे बार्शी नगरपरिषदेच्या विषय समित्यांवर वर्चस्व

तरुण भारतbyतरुण भारत
February 3, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी –  नगरपरिषदेच्या विशेष सभेत विविध विषय समित्यांचे सदस्य व सभापती निवडीची प्रक्रिया शांततेत व बिनविरोध पार पडली. या सर्व समित्यांवर भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व राहिले असून, सर्व समित्यांच्या सभापतीपदी भाजपच्या नगरसेवकांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मुख्याधिकारी तथा पीठासन अधिकारी तैमूर मुलाणी यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा पार पडली. सभेच्या सुरुवातीला विमान अपघातात दुःखद निधन झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नगरपरिषदेत एकूण सहा विषय समित्या असून प्रत्येक समितीत १२ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपनगराध्यक्ष हे नियोजन व विकास समितीचे पदसिद्ध सभापती असतात. त्यानुसार उपनगराध्यक्ष रोहित पाटील यांच्या अध्यक्षतेखालील नियोजन व विकास समितीसाठी ११ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. उर्वरित सर्व समित्यांमध्ये १२ सदस्यांचा समावेश आहे. प्रत्येक समितीत सत्ताधारी भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीचे ७ तर विरोधी शिवसेनेचे (उबाठा) ५ सदस्य घेण्यात आले आहेत.. 

नगराध्यक्षा तेजस्विनी कथले या स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापती असून, स्थायी समितीत भाजपचे विजय राऊत, शिंदे सेनेचे संदेश काकडे व विरोधी उद्धव सेनेचे कृष्णराज बारबोले यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच सर्व विषय समित्यांचे सभापती हे स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य असतात. भाजप गटनेते विजय चव्हाण, शिवसेनेचे (शिंदे गट) राजू घोंगाणे व शिवसेना (उबाठा) चे नागेश अक्कलकोटे यांनी आपल्या-आपल्या पक्षाच्या सदस्यांची नावे मुख्याधिकाऱ्यांकडे

सादर केल्यानंतर अधिकृतरित्या या निवडी जाहीर करण्यात आल्या. नवनियुक्त सभापती व सदस्यांचे माजी आमदार राजेंद्र राऊत तसेच नगराध्यक्ष तेजस्विनी कथले यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

विषय समित्यांचे सभापती व सदस्य पुढीलप्रमाणे-

स्थायी समिती सभापती (पदसिद्ध) तेजस्विनी कथले, सदस्य विजय राऊत, संदेश काकडे, कृष्णराज बारबोले व सर्व विषय समित्यांचे सभापती. सार्वजनिक बांधकाम समिती सभापती दीपक राऊत, सदस्य प्रकाश माने, स्वप्नील उघडे, कांचन मोहिते, विजय चव्हाण, राजू घोंगाणे, भागिरथी त्रिंबके, नागेश अक्कलकोटे, राहुल कोंढारे, मुजम्मील पठाण, नवनाथ माळगे, सरस्वती भानवसे.

शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती: भारत पवार, सदस्य- कांचन मोहिते, फरजाना जलसे, उर्मिला मोहिते, सुजाता मस्के, राजू घोंगाणे, शमा रिकीबे, अनिकेत कारंडे, सायरा मुल्ला, आकाश राऊत, ज्योर्तिलिंग कसबे, अमोल मांगडे.

स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती अमोल चव्हाण, सदस्य स्वप्नील उघडे, अर्चना बारसकर, अनुरथ वाणी, फरजाना जलसे, शमा रिकीबे, मिरा नाळे, नवनाथ माळगे, विद्या बंगाळे, रागिणी पाचपुते, चांगुणा जाधव, भागवत मांगडे.

पाणीपुरवठा व जलनिःसारण समिती सभापती संतोष बारंगुळे, सदस्य उर्मिला मोहिते, चंद्रकला कांबळे, विजय चव्हाण, प्रकाश माने, मिरा नाळे, बाळासाहेब पवार, वसंत देवकर, शिला साळुंके, महेदिमियां लांडगे, सरस्वती भानवसे.

नियोजन व विकास समिती सभापती रोहित पाटील (उपनगराध्यक्ष), सदस्य लक्ष्मीबाई गव्हाणे, चंद्रकला कांबळे, अनुरथ वाणी, अर्चना बारसकर, राजू घोंगाणे, भागिरथी त्रिंबके, राहुल कोंढारे, महेदिमियां लांडगे, विद्या बंगाळे, मुजम्मील पठाण, अनिकेत कारंडे.

महिला व बालकल्याण समिती सभापती अबिदा तांबोळी, उपसभापती : सुनिता ढोणे, सदस्य उर्मिला मोहिते, सुजाता मस्के, लक्ष्मीबाई गव्हाणे, मिरा नाळे, भागिरथी त्रिंबके, शांता नायकोजी, चांगुणा जाधव, गोदावरी शिंदे, सायरा मुल्ला, रागिणी पाचपुते यांची निवड करण्यात आली आहे.

Post Views: 53
Previous Post

गॅलेक्सी पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

Next Post

नीट परीक्षेत सोलापूरच्या चव्हाण दाम्पत्याचे यश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

नीट परीक्षेत सोलापूरच्या चव्हाण दाम्पत्याचे यश

ताज्या बातम्या

‘तरुण भारत ‘च्या पुणे आवृत्तीचे लोकार्पण

April 18, 2026

अक्षय तृतीया संकल्पनातून आत्मसमृद्धीकडे नेणारा दानाचा दिव्य मार्ग – मुनिश्री

April 18, 2026

जुळे सोलापूर ब्रह्म बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने परशुराम पूजन आयोजन

April 18, 2026

हमीभावाने ज्वारी खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी ; सोयगाव

April 18, 2026

सीबीएसई बोर्ड परीक्षेमध्ये निरज पाटील प्रथम

April 18, 2026

सोलापूरच्या रणरागिणींची विजयी घोडदौड ; कोल्हापूर आणि पुण्यावर दिमाखदार विजय

April 18, 2026

कर्णधार संदेश गाडेचे शानदार शतक; श्रवण माळी ‘ मॅन ऑफ द मॅच ‘

April 18, 2026

दोन्ही आ. देशमुख करत आहेत करवाढीला विरोध

April 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0817256

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697