Tuesday, April 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महारेशीमचा शुभारंभ; 5 हजार एकरवर तुती लागवडीचे लक्ष्य

तरुण भारतbyतरुण भारत
February 14, 2026
in marathwada
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जालना – जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन शाश्वत उत्पन्नासाठी रेशीम उद्योगाकडे वळावे, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘महारेशीम अभियान-2026’ चा शुक्रवार दि.13 फेब्रुवारी 2026 रोजी शुभारंभ करण्यात आला.  जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते रेशीम चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून या नोंदणी मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावर्षी जिल्ह्यात तब्बल 5 हजार एकर क्षेत्रावर नवीन तुती लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. इतर पिकांच्या तुलनेत रेशीम शेती शाश्वत आणि अधिक नफा देणारी आहे. जालना जिल्ह्यात रेशीम प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन दिले जात असल्याने शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी, रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक एस.आर. जगताप, के.एन. जाधव, डॉ. जी.के. गीते यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच किरण ढगे (डी.एस. युनिट), जावेद एम. शेख, सचिन भुजबळ, ग्लोबल विकास ट्रस्टचे पवन परतूरकर, कृष्णा ढेंबरे आणि प्रगतशील रेशीम उत्पादक शेतकरी पांडुरंग निंबाळकर उपस्थित होते.

जालना जिल्हा हा रेशीम कोषासाठी मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आता ‘सोईल टू फॅब्रिक’ (माती ते कापड) ही संकल्पना राबविण्यात येत आहे. म्हणजेच केवळ तुती लागवडच नाही, तर कापड निर्मितीपर्यंतचे प्रक्रिया उद्योग जिल्ह्यात सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी सांगितले.

‘महारेशीम अभियान-२०२६’ अंतर्गत जिल्हा प्रशासनाने हा विशेष ‘रेशीम चित्ररथ’ तयार केला आहे. रेशीम शेती म्हणजे नेमके काय? अनुदान कसे मिळते? आणि रेशीम कीटक संगोपन कसे करायचे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता शेतकऱ्यांना त्यांच्या गावातच मिळणार आहेत. चित्ररथावर रेशीम लागवडीपासून ते कापड निर्मितीपर्यंतची सर्व माहिती चित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. हा चित्ररथ जिल्ह्यातील रेशीम शेतीसाठी निवडण्यात आलेल्या गावांच्या समूहामध्ये फिरणार आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी या अभियानात तीन प्रमुख योजनांची सांगड घालण्यात आली आहे. यामध्ये ‘मनरेगा’, केंद्र सरकारची ‘सिल्क समग्र-2’ आणि ‘पोकरा-2’ (हवामान अनुकूल कृषी प्रकल्प) या योजनांचा समावेश आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान आणि तांत्रिक साहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. या त्रिवेणी संगमाचा लाभ घेऊन अधिकाधिक शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दि. 4 फेब्रुवारी ते 5 मार्च 2026 पर्यंत अभियान कालावधी असून  गावोगावी फिरणारा ‘रेशीम चित्ररथ’ शेतकऱ्यांना तुती लागवडीच्या तांत्रिक माहितीसह नोंदणीसाठी प्रोत्साहित करणार आहे.  रेशीम विभाग, मनरेगा, पंचायत समिती आणि कृषी विभाग संयुक्तपणे ही मोहीम राबविणार आहेत.

जालना जिल्ह्यात सुरू झालेल्या ‘महारेशीम अभियान-२०२६’ ला आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या (पोक्रा-२) दुसऱ्या टप्प्याची भक्कम साथ मिळणार आहे. या योजनेतून रेशीम उद्योग सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाख २५ हजार रुपयांपासून ते ३ लाख ९० हजार रुपयांपर्यंत भरघोस अनुदान जाहीर करण्यात आले असून, यामुळे जिल्ह्यातील रेशीम क्षेत्रात मोठी क्रांती होण्याची शक्यता आहे.   सर्वसाधारण प्रवर्गाला प्रति एकर एकूण ३,२५,१२५ रुपये अनुदान तर  अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गाला प्रति एकर एकूण ३,९०,१५० रुपये अनुदान मिळणार आहे. या योजनेसाठी जागतिक बँकेचा निधी उपलब्ध असल्याने प्रक्रियेत पारदर्शकता राहील आणि शेतकऱ्यांना त्यांचे अनुदान वेळेत मिळण्यास मदत होईल.

Post Views: 51
Previous Post

वंदे भारत एक्सप्रेस मध्ये साप ठेवणाऱ्याला अटक

Next Post

रोजगार मेळाव्यात 44 उमेदवारांची निवड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

रोजगार मेळाव्यात 44 उमेदवारांची निवड

ताज्या बातम्या

प्रा. चरणसिंह कायटे यांचे दुहेरी यश

April 21, 2026

सोलापूर शहरात पावसाची हजेरी

April 21, 2026

हिंगोली जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक – डॉ. नीलाभ रोहन

April 21, 2026

राज्य कर्मचारी शिक्षक बेमुदत संपावर

April 21, 2026

सोयगाव शहरात पहिल्या बाल उद्यानाचे उद्घाटन संपन्न

April 21, 2026

पतीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून ; चुलतीनेच केला पुतण्याचा खून ..

April 21, 2026

पूर्णा नदी पात्रातून अवैध्य वाळू उपसा ; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप

April 21, 2026

गंधोदक हे केवळ जल नसून सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत

April 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0822224

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697