वैराग – अॅग्रोन्यूज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट (फलटण, जि. सातारा) यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात वैरागचे सुपुत्र आणि हरहुन्नरी कवी प्रा. इंद्रजीत पाटील यांना ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार – २०२६’ देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या ‘चिबाड’ या बहुचर्चित कवितासंग्रहास हा बहुमान मिळाला आहे.
हा सोहळा संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा. श्रीमंत अनिकेतराजे ना. निंबाळकर, संमेलनाध्यक्ष प्रा. विजयजी काकडे, ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ शिंदे, अशोकजी मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
संयोजन: कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन कार्याध्यक्ष प्रा. महादेव गुंजवटे, संयोजक प्रकाश गणपतराव सस्ते आणि निमंत्रक ज्ञानेश्वर विश्वासराव देशमुख यांनी केले.
’चिबाड’ची यशस्वी घोडदौड
प्रा. इंद्रजीत पाटील यांच्या ‘चिबाड’ या कवितासंग्रहाने साहित्य क्षेत्रात अल्पावधीतच आपली मोहोर उमटवली आहे. या संग्रहास मिळालेला हा पाचवा राज्यस्तरीय पुरस्कार असून, ग्रामीण जीवनाचे वास्तव मांडणाऱ्या त्यांच्या लेखणीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शुभेच्छांचा वर्षाव:
इंद्रजीत पाटील यांच्या या यशाबद्दल माधवरावजी कुतवळ, चंद्रकांत पाटील, रावसाहेब पाटील, संजय भड, अमोल देशमुख, जीवराज गरड यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


















