अक्कलकोट – तालुक्यातील चपळगाव येथील जामा मस्जिद येथे येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या वतीने नुकतेच रमझान ईदच्या पवित्र महिन्यानिमीत्त चपळगाव मधील रोजा (उपवास) राहणाऱ्या मुस्लीम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या चपळगाव जामा मस्जिद येथील इफ्तार पार्टीत चपळगांव येथील मौलाना मुफ्ती, सलाहुद्दीन साहब, सलीम पटेल, मुबारक शेख, मुरतूज पटेल, युनूस पटेल, रमेश शिंदे, मेंबर महबूब तांबोळी, एजाज पटेल, अल्लाउद्दीन फुलारी, अब्बास पटेल, आलिम पटेल, मोहसिन पटेल, यासीन फुलारी, फैजान पटेल, रहमान सय्यद, कैफ पटेल, सैपन फुलारी, अयान पटेल, रहमान पटेल, आदींसह सर्व हिंदू मुस्लीम बांधव व महेश मालक इंगळे मित्र परिवार मधील रमेश शिंदे सर, श्रीकांत झिपरे, बाबा सुरवसे आदी सहभागी झाले होते.
फोटो ओळ – चपळगाव येथील जामा मस्जिद मध्ये नगरसेवक महेश मालक इंगळे यांच्या सहभागी तर्फे आयोजीत इफ्तार पार्टीत मौलाना मुफ्ती, सलाहुद्दीन साहब, महेश मालक इंगळे मित्र परिवार मधील रमेश शिंदे सर, श्रीकांत झिपरे, बाबा सुरवसे आदींसह उपस्थित हिंदू मुस्लीम बांधव छायाचित्रात दिसत आहेत.























