सोलापूर – मराठा समाजावर राजकीय अन्याय करून झोपीचे सोंग घेणारे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना जागे करण्यासाठी आणि मराठा समाजाचे चालू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन राजकीय न्याय द्यावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण शहर जिल्ह्यातील आमदारांना जागे करण्यासाठी “थाळी नाद “ आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती मराठा आंदोलक राम जाधव यांनी दिली.
१९९३ नंतर तब्बल ३२ वर्षांनी मराठा समाजाचा महापौर होण्याची संधी असताना पालकमंत्री जयकुमार गोरे,आमदार देवेंद्र कोठे, शहर रोहिणी तडवलकर यांनी होऊन दिले नाही. सर्वसाधारण साठी जागा असताना OBC चा महापौर केला.

























