Sunday, May 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अर्धनारी नटेश्वराचा हळदी सोहळा भक्तिभावात संपन्न;  यात्रोत्सवाला दिमाखात प्रारंभ

तरुण भारतbyतरुण भारत
March 25, 2026
in editor
0
अर्धनारी नटेश्वराचा हळदी सोहळा भक्तिभावात संपन्न;  यात्रोत्सवाला दिमाखात प्रारंभ
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वेळापूर – आराध्य दैवत अर्धनारी नटेश्वर यांच्या वार्षिक यात्रोत्सवाला भक्तिभाव, परंपरा आणि उत्साहाच्या वातावरणात प्रारंभ झाला. यात्रेतील प्रमुख मानला जाणारा हळदी सोहळा सोमवारी अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यासाठी सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने वेळापूर येथे दाखल झाले होते.

गुढीपाडव्याच्या सणापासून यात्रेला प्रारंभ होत असला तरी देवाच्या हळदी सोहळ्याने यात्रेचा खऱ्या अर्थाने शुभारंभ मानला जातो. सोमवारी दुपारी चारनंतर मंदिर परिसरात धार्मिक विधींना सुरुवात झाली. प्रारंभी अर्धनारी नटेश्वराला गरम पाण्याने व त्यानंतर गार पाण्याने विधिवत स्नान घालण्यात आले. त्यानंतर देवाचा मानाचा पोशाख गणेश सावता वसेकर यांनी आणून दिला. तो पोशाख देवाला परिधान करून त्यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.

यावेळी मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. देवाच्या दारात सुंदर रांगोळी काढण्यात आली होती.  मंदिराच्या आत व बाहेर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला होता.

धार्मिक विधी गौरीहर गुरव, सतीश गुरव व रविराज गुरव यांनी पार पाडले. हळदी सोहळ्याच्या पारंपरिक मानाप्रमाणे पालकर परिवाराच्या वतीने पार्वती देवीला चूडा ठेवण्यात आला. यावेळी मोहन पालकर, मनीषा पालकर व अंजली शशिकांत पालकर यांनी महिलांना बांगड्या भरल्या. तसेच होडगे परिवाराच्या वतीने राधिका होडगे, अनिता होडगे, दिशा होडगे, अनुराधा होडगे, आशा बिले, अनुराधा पोरे व रतन होडगे यांनी महिलांना हळदी-कुंकू लावून त्यांची ओटी भरली.

अर्धनारी नटेश्वराची विधिवत पूजा झाल्यानंतर उपस्थित महिलांनी मोठ्या भक्तिभावाने देवाला तेल व हळद अर्पण केली. यावेळी देवाचे पुजारी असणाऱ्या गुरव कुटुंबातील पाच महिलांसह पं.स. सदस्या विमलताई उत्तमराव जानकर, जि.प. सदस्या मीनाक्षी मिलिंद सरतापे, सौ. सीमा खाडे, प्रियंका आडत, अर्चना गुरव, संजीवनी गुरव, अश्विनी गुरव, अर्चना उरणे, सोनाली गाढवे, अनिता बनसोडे, अश्विनी भानवसे, आधीश्री गाढवे, शिवानी गाढवे, राधिका होडगे, दिशा होडगे यांच्यासह हजारो महिलांनी देवाला हळद लावून भक्तीभाव व्यक्त केला.

यानंतर अर्धनारी नटेश्वराला मानाचा पोशाख परिधान करून आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांना माळी समाजाच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

या हळदी सोहळ्याचे पोरोहित्य पुजारी गौरीहर गुरव, सतीश गुरव व रविराज गुरव यांनी केले. कार्यक्रमास प.स. सदस्या विमलताई जानकर, जि.प. सदस्या मीनाक्षी मिलिंद सरतापे, वेळापूरचे सरपंच रजनीश बनसोडे, उपसरपंच नानासाहेब मुंगुसकर, रिपाई (आठवले) माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे ,

यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष काशिनाथ आडत, उपाध्यक्ष अॅड. विठ्ठल मंडले, उपाध्यक्ष रणजीत साठे, कार्याध्यक्ष अमोल मंडलिक, खजिनदार दादा तुपे, सरचिटणीस विनायक भगत, सचिव अभिजीत साठे, सेक्रेटरी विजय पवार, सदस्य मनोहर माने तसेच महादेवभाऊ ताटे, सुरेश पिसे, धनंजय माने देशमुख, भागवत गायकवाड, कैलास सुरवसे, शंकर आडत, महादेव म्हेत्रे, शिवाजी सावंत, सावता मेहत्रे, शिवाजी मोहिते, गौरीशंकर गाढवे, संतोष मेहत्रे, युवराज मंडले, प्रदीप सरवदे, डॉ. धनंजय मेहत्रे, राहुल सराटे, अक्षय गाढवे आदींसह यात्रा कमिटीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व हजारो महिला भाविक उपस्थित होत्या.

यात्रोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

—————————————

अर्धनारी नटेश्वराच्या हळदी सोहळ्यावेळी देवाला हळद अर्पण करताना पं.स. सदस्या विमलताई जानकर, जि.प. सदस्या मीनाक्षी मिलिंद सरतापे, सीमा खाडे व इतर महिला भाविक.

Post Views: 82
Previous Post

आयएमएस समर्थ, रॉयल्स या संघाची विजयी सलामी; इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग – १६ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

Next Post

युद्धाच्या पार्श्वभूमीवर बनतोय चुलींवर स्वयंपाक; भोजनार्थींकडून चविष्ट पदार्थांची वाहवा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
युद्धाच्या पार्श्वभूमीवर बनतोय चुलींवर स्वयंपाक; भोजनार्थींकडून चविष्ट पदार्थांची वाहवा

युद्धाच्या पार्श्वभूमीवर बनतोय चुलींवर स्वयंपाक; भोजनार्थींकडून चविष्ट पदार्थांची वाहवा

ताज्या बातम्या

नसरापूरच्या चिमुकलीसाठी पुढाकार घेणार महाडिक

May 17, 2026

पाण्यावरून शिवसेनेच्या अमोल बापू शिंदेनी केली भाजपवर कडक टिका

May 17, 2026

आम्हाला किंमत का देत नाही म्हणून तरुणाच्या डोक्यात घातली फरशी #marathinews #solapurnews

May 17, 2026

५० लाखांसाठी विवाहितेचा छळ #solapurnews #viral

May 17, 2026

पैसे नव्हे थेट एटीएम पळवली #marathinews #viral

May 17, 2026

मेफेड्रोन प्रकरणी साहिल पिरजादेला वाढीव कोठडी #marathinews #solapurnews

May 17, 2026

जुळे सोलापूरात होंडा दुचाकी गोडाऊन भागात लागली आग

May 17, 2026

दूध टँकर कारची धडक ; १ ठार ,२ जखमी #marathinews

May 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0868265

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697