सोलापूर : केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे प्रथम वर्ष अभियांत्रिकी (F.Y. B.Tech) विद्यार्थ्यांसाठी पालक सभेचे आयोजन करण्यात आले.
जनरल सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही सभा सर एम. विश्वेश्वरय्या सेमिनार हॉलमध्ये संपन्न झाली.
या कार्यक्रमात प्रथम वर्षाच्या सेमिस्टर–१ विद्यापीठ परीक्षेतील उल्लेखनीय निकालाची माहिती पालकांना देण्यात आली. या परीक्षेत ८ विद्यार्थ्यांनी १० पैकी १० SGPA मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले, तर ५७ विद्यार्थ्यांनी ‘O’ ग्रेड प्राप्त केली. तसेच २ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या पहिल्या दहा गुणवंतांमध्ये स्थान मिळवले. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यापीठ निकालात लक्षणीय सुधारणा झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या उल्लेखनीय यशाबद्दल उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामागे पालकांचे प्रोत्साहन आणि सहकार्य महत्त्वाचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या कार्यक्रमाला कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, प्राचार्य डॉ. एस. डी. नवले, सीआरटीडीचे संचालक डॉ. एस. एच. पवार, जनरल सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. के. एस. पाटील तसेच समन्वयक डॉ. ए. ए. कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महाविद्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. पालकांनीही या उपक्रमांचे कौतुक करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाच्या प्रयत्नांना पाठिंबा दर्शविला.

























