सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे व लवंगी येथील भीमा नदी पात्रातील लिलाव झालेला वाळू साठा शासनाच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे पंधरा दिवसांसाठी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे.
मंद्रूप अप्पर तहसीलदार विष्णू बुटे यांनी भंडारकवठे व लवंगी येथील वाळू साठ्याला भेट देऊन शासनाच्या नियमाचे पालन करण्याचे आदेश ठेकेदारांना दिले होते. मात्र ठेकेदारांनी नियमाचे उल्लंघन न केल्यामुळे त्यांनी वाळू साठा बंद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठविला होता. त्यानुसार २६ मार्च रोजी निंबर्गीचे मंडल अधिकारी राणा वाघमारे व भंडारकवठयाचे तलाठी गणेश भुजबळ यांनी भंडारकवठे व लवंगी वाळू साठा बंद केला.
पंधरा दिवसांसाठी दोन्ही वाळू साठ्यातून वाळू उचलण्यास व वाहतूक करण्यास बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिला आहे.


























