पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव परीसरातील सर्वच गावात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीतील नावाची पडताळणी करणयासाठी घरोघरी जाऊन पडताळणीचे फाॅर्म भरुन घेतले जाणार आहेत. यासाठी दिलेला फाॅर्म व्यवस्थीत भरुन त्यावर सही किंवा अंगठा करुन बीएलओ यांना देणे आवश्यक आहे.त्यातील एक फाॅर्म स्वतःकडे ठेवायचा आहे.ज्या मतदारांचे वय 40 वर्षापेक्षा अधिक आहे त्यांनी 2002 च्या यादीतील अनुक्रमांक टाकायचा आहे.तर ज्याचे वय 40 पेक्षा कमी आहे .त्यांनी त्यांचे आई_ वडील, आजी _ आजोबा यापैकी एकाचे 2002 च्या यादीतील नाव व क्रमांक देऊन मतदार यादीतील नाव कायम करायचे आहे.विवाहीत महीलांसाठी माहेरकडील आई वडील, आजी आजोबा यांची माहीती खाञी करुन घ्यायची आहे.जे मतदार हे फाॅर्म भरुन देणार नाहीत त्यांची नावे मतदार यादीतुन वगळली जाणार आहेत. हा कार्यक्रम 29 जुनपासुन एक महीना सुरु राहणार आहेत. यासाठी मतदारांनी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, दोन आयडेंटिटी फोटो आवश्यक आहेत. सध्या ही मोहीम पिलीव, सुळेवाडी, बचेरी, शिंगोर्णी, झिंजेवस्ती, कुसमोड यासह सर्वच गावात सुरु आहेत. यासाठी बीएलओ, अंगणवाडी सेवीका, आशा सेवीका, शिक्षक काम करीत आहेत. यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सहकार्य करावे असे आवाहन पिलीवचे मंडल अधिकारी विजय एकतपुरे यांनी केले आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















