Saturday, May 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर औद्योगिक वसाहतींसाठी 56 कोटी निधी मंजूर 

तरुण भारतbyतरुण भारत
March 29, 2026
in editor
0
सोलापूर औद्योगिक वसाहतींसाठी 56 कोटी निधी मंजूर 
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राज्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाने सोलापूरमधील औद्योगिक पायाभूत सुविधांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहत आणि होटगी रोडवरील सोलापूर सहकारी औद्योगिक वसाहतीतील एकूण 44 रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी तब्बल रु. 55.94 कोटींच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती आ. देवेंद्र कोठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

            या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती देताना आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, ही मंजुरी महाराष्ट्र औद्योगिक पायाभूत सुविधा निर्मिती व विकास योजना अंतर्गत देण्यात आली असून, यामुळे सोलापूरच्या औद्योगिक परिसरातील वाहतूक व्यवस्था आणि लॉजिस्टिक साखळी अधिक सक्षम होणार आहे.दि. 13 मार्च 2026 रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 13 व्या उच्चस्तरीय समिती बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सोलापूर महानगरपालिकेने सादर केलेल्या प्रस्तावास मान्यता देत निधी उपलब्ध करून देण्यास हिरवा कंदील देण्यात आला.

या संदर्भातील शासन निर्णय दि. 28 मार्च 2026 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

         ही मंजुरी “महाराष्ट्र औद्योगिक पायाभूत सुविधा निर्मिती व विकास योजना” अंतर्गत देण्यात आली असून, यामुळे सोलापूरमधील औद्योगिक वसाहतींतील रस्ते सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारतील. परिणामी उद्योगांच्या वाहतुकीत सुलभता येऊन गुंतवणूक व रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे, असे आ. कोठे यांनी सांगितले.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच केवळ सोलापूर साठी हा ऐतिहासिक आणि विशेष निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे  हे सोलापुरातील उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. सोलापुरातील दोन एमआयडीसीमध्ये अनेक वर्षापासून मूलभूत सोयी सुविधांचा अभाव होता मागील वर्षी आगीची दुर्दैवी घटना ही घडली होती. यामुळे या मतदारसंघातील आमदार म्हणून मी शहरातील दोन्ही एमआयडीसीतील रस्ते आणि सोयी सुविधांसाठी निधी मिळण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तांत्रिक अडचणी दूर करत मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून अखेर हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय मंजूर केला आहे असे सांगत आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानले.

      या पत्रकार परिषदेस महापौर विनायक कोंड्याल , चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, नगरसेवक विजय चिप्पा, सिद्धेश्वर कमटम, श्रीनिवास दायमा, नगरसेविका सारिका खजूरगी, स्विय सहाय्यक शैलेश कडदास आदी उपस्थित होते.

कोणत्या कामांसाठी किती निधी ?

अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहत – 35 रस्त्यांचे डांबरीकरण – खर्च: 50.22 कोटी रुपये,

होटगी रोड औद्योगिक वसाहत (सोलापूर सहकारी औद्योगिक वसाहत)- 9 रस्त्यांचे डांबरीकरण –

खर्च: 5.71 कोटी रुपये, एकूण खर्च: 55.94 कोटी रुपये  इतका आहे.

निधी वाटपाची रचना अशी 

मंजूर निधी वाटपाची रचना अशी राहणार आहे.

राज्य शासन : 75 टक्के (41.95 कोटी रुपये)

जिल्हा नियोजन व विकास योजना: 12.5 टक्के (6.99 कोटी रुपये)

सोलापूर महानगरपालिका : 12.5 टक्के ( 6.99 कोटी टक्के). हा मंजूर निधी राज्य शासनाकडून उद्योग संचालनालयामार्फत आहरित करून आभासी ठेव खात्यात जमा केला जाईल. त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मार्फत तो सोलापूर महानगरपालिकेला वितरित केला जाणार आहे.

महापालिकेकडे राहणार कामाची जबाबदारी  

या प्रकल्पाची अंमलबजावणी सोलापूर महानगरपालिका करणार असून, सर्व कामे नियोजित कालावधीत पूर्ण करण्याची जबाबदारी महापालिकेवर राहणार आहे. भविष्यातील रस्ते देखभाल व दुरुस्तीची जबाबदारीही महापालिकेलाच पार पाडावी लागणार आहे. तसेच, प्रकल्प खर्चात वाढ झाल्यास अतिरिक्त आर्थिक भार देखील महापालिकेलाच उचलावा लागणार आहे.

औद्योगिक विकासाला चालना

या प्रकल्पामुळे औद्योगिक वसाहतींमधील रस्ते सुविधा सुधारल्याने उद्योगांना वाहतूक, कच्चा माल पुरवठा आणि उत्पादन वितरण अधिक सुलभ होणार आहे. परिणामी, सोलापूरमध्ये गुंतवणूक वाढ, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अधिक उद्योग आकर्षित करण्यासाठी 

पायाभूत सुविधा महत्त्वाची : आ. देवेंद्र कोठे 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर च्या विकासासाठी भरभरून दिले आहे. आता सोलापुरातील दोन्ही एमआयडीसीसाठी हा मोठा निधी उपलब्ध केला आहे. विशेष बाब म्हणून हा शासन आदेश काढला आहे.

या निधी मंजुरीमुळे सोलापूरच्या औद्योगिक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार असून, उद्योगांना मोठा दिलासा मिळेल. आगामी काळात अधिक उद्योग आकर्षित करण्यासाठी ही पायाभूत सुविधा महत्त्वाची ठरेल, असा विश्वास आ. देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केला. निधी मंजूर केल्याबद्दल आ. देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानले.

उद्योग वाढीला चालना मिळेल : महापौर कोंड्याल 

सोलापूर शहरातील एमआयडीसी मध्ये सुमारे 40 हजार कामगार काम करतात. 300 एकर क्षेत्रात ही एमआयडीसी वसली आहे. या ठिकाणी रस्त्यांसह विविध सोयी सुविधा कराव्यात अशी मागणी येथील उद्योजक, कामगार आणि नागरिकांची होती. आमदार देवेंद्र कोठे यांनी यशस्वी पाठपुरावा केला. आमदार कोठे हे जे बोलतात ते काम तडीस नेतातच. एका वर्षात त्यांनी एमआयडीसींसाठी भरघोस निधी आणला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निधी मंजूर केला. याबद्दल मुख्यमंत्री तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार कोठे यांचे महापौर विनायक कोंड्याल यांनी आभार मानले.

सोलापुरातील उद्योजकांना 14 कोटीचा दिलासा

या योजनेअंतर्गत 25 टक्के रक्कम एमआयडीसीतील उद्योजकांनी भरणे आवश्यक होते. उद्योजकांना ते अडचणीचे होते तसेच महापालिकेकडेही निधीची कमतरता असते. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून निर्णय घेत उद्योजकांना दिलासा दिला. 14 कोटीचा भुर्दड उद्योजकांना नको अशी सूचना केली.उद्योजकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले. मुख्यमंत्री यांनी सकारात्मक निर्णय घेत १४ कोटी रुपयांची सूट दिली, ही सोलापूरसाठी मोठी बाब आहे असे आमदार कोठे यांनी सांगितले.

Post Views: 23
Previous Post

रेल्वे गाड्यांना थांबा; वेताळ परिवाराचे आंदोलन तात्पुरते स्थगित

Next Post

शेतकऱ्यांसाठी सिंगल फेज वीजपुरवठा सुरू ठेवावा; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मागणी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शेतकऱ्यांसाठी सिंगल फेज वीजपुरवठा सुरू ठेवावा; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मागणी

शेतकऱ्यांसाठी सिंगल फेज वीजपुरवठा सुरू ठेवावा; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मागणी

ताज्या बातम्या

आता मुलांना मिळणार सर्व लसीकरण #marathinews

May 16, 2026

मनीषा मानेवर दोष निश्चितीला वेळ #solapurnews

May 16, 2026

हडपसर मध्ये बॉम्ब ठेवणारा शिवाजी राठोड सोलापूरचा

May 16, 2026

रोटरीची आशा एक्सप्रेस करणार महिलांच्या मोफत कॅन्सर टेस्ट

May 16, 2026

मुंबई पुणे एक्सप्रेसवर झालेल्या अपघातात संपूर्ण रस्त्यावर रंग विखुरला #viral #marathinews

May 16, 2026

जिल्हापरिषदेच्या सीईओनी केले नो व्हेईकल डे चे आवाहन #solapurnews

May 16, 2026

इस्लापूर येथे जलजीवन मिशनच्या मेन लाईनला गळती #marathinews

May 16, 2026

कळंब येथे बिर्याणी सत्याग्रह अनोखे आंदोलन #marathinews

May 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0867053

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697