उमरी – आमदार कै . बाबासाहेब देशमुख गोरठेकर आ . कै बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या हाती गेली चाळीस वर्षा पासुन एक हाती सत्ता खरेदी विक्री संघावर होती त्यांच्या निधनानंतर ही मतदारानी गोरठेकर घराण्यातील तिसऱ्या पिडीला तेवढीच साथ देवून विरोद्धकाच्या अरोपाला फेटाळून मतदान रूपी आशीर्वाद दिल्याने गोरठेकर बंधूचा खरेदी विक्री संघाचा गट बहुमताने कायम राहीला आहे राष्ट्रवादी गोरठेकर यांचे दहा तर भाजपा चे उदोजक कवळे गुरूजी यांच्या गटाला तीन जागा मिळाल्या आहेत .
उमरी खरेदी विक्री संघाची निवडणूक दि. २९ मार्च रोजी पहाडगल्लीतील जिल्हा परिषद शाळेत पार पडली.. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे शेतकरी विकास पॅनल व सहकार बचाव पॅनलमध्ये लढत झाली. या निवडणुकीत राकाँच्या गोरठेकर यांच्या पॅनलने विजयाची मुसंडी मारली तर भाजपा खा . अशोकराव चव्हाण ,आ.राजेश पवार नेतृत्वाखाली पार पडलेल्या या निवडणुकीत उदोजक मारोतराव कवळे गुरुजीं आणि माजी नगराराध्यक्ष संजय कुलकर्णी , डॉ विक्रम देशमुख ,बापुसाहेब कौडगावकर ,ज्ञानेश्वर पा सावंत यांच्या प्रयत्नाअंती या गटाचे ३ उमेदवार निवडून आले.
तालुक्याचे लक्ष लागलेल्या उमरी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. परंतु स्थापनेपासून असलेले गोरठेकर गटाचे वर्चस्व यावेळीही राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनलचे नेते बाजार समितीचे सभापती शिरीष गोरठेकर, उपनगराध्यक्ष कैलास देशमुख गोरठेकर, प्रल्हाद पाटील ढगे, गणेशराव पाटील गाढे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक प्रवीणभाऊ सारडा ,प्रकाश पाटील चिंचाळकर, सुभाषराव गोरठेकर, सुधाकर देशमुख धानोरकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजीव पाटील ढगे बोळसेकर, आनंदराव यल्लमगोंडे, बालाजी जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजीव पाटील ढगे इज्जतगावकर, सदाशिव पुपूलवाड, कैलास गोरठेकर यांचे पीए नागेश बट्टेवाड यांच्यासह अनेक कार्यकत्यांनी पॅनलला विजयी करण्यात सहकार्य केले.
उमरी खरेदी विक्री संघाच्या १२ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात होते. होते. या निवडणुकीत गोरठेकर गटाचे वैयक्तिक गटातून राघोजी माधवराव जाधव, बालाजी पाटील पवार हातनीकर, महिला गटातून कलावतीबाई ढगे, ललिता
यल्लमगोंडे, अनूसूचित जाती जमातीमधून लक्ष्मण हिरमोड, इतर मागासवर्गीयमधून मारोती आनेराये, सहकारी संस्था गटातून व्यंकटराव कदम, नारायण जिरोणेकर, रावसाहेब पवार विजयी झाले असून गणेश अन्नेमवाड बितनाळकर हे यापूर्वी बिनविरोध निवडून आले आहेत. हे सर्व गोरठेकर गटाचे उमेदवार असून भाजपा आ. राजेश पवार व मारोतराव कवळे गुरुजींच्या सहकार बचाव पॅनलचे दादाराव गायकवाड, अशोक मोरे, माधवराव पवळे हे ३ जण निवडून आले आहेत. विशेष म्हणजे गोरठेकर गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते नारायणराव जिरोणेकर हे २५ वर्षांपासून संस्थेवर संचालक, ८ वर्षे सभापती तर ५ वर्ष उपसभापती होते. यावेळीही मतदारांनी गोरठेकर घराण्याच्या तिसऱ्या पिढीवर विश्वास व्यक्त करीत सत्तेची चावी दिली आहे. निवडणूक भाजपाच्या गटाला तीन जागावर समाधान मानावे लागले .
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय कार्लेकर तर केंद्र प्रमुख बी.बी.पवार, प्रफुल्ल कांबळे, के. बी. आबादार, आर एस सोनकांबळे, सय्यद शब्बीर यांनी काम पाहिले. मतदान व मतमोजणीच्या वेळी पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन आरमाळ महेंद्रकुमार, पोकुलवार व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. उमेदवार निवडून आल्यावर गोरठेकर गटाने विजयी रॅली काढली. या रॅलीत शिरीष देशमुख गोरठेकर, कैलास देशमुख गोरठेकर, गणेशराव गाढे, सुधाकर देशमुख धानोरकर, कॉंग्रेसचे राजीव पाटील बोळसेकर, प्रल्हाद पाटील ढगे इज्जतगावकर, आनंदराव वल्लगोडे, बालाजीराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसाचे राजीव पाटील ढगे इज्जतगावकर, नागेश बट्टेवाड नगर पालिकेचे नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फटाके फोडून गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

















