करकंब : जि.प.प्रा.शाळा सांगवी ता.पंढरपूर येथील सहशिक्षक संजय महादेव सत्रे यांना पंचायत समिती पंढरपूर यांच्यावतीने आदर्श तालुका शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला.
वस्ती शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता व पटसंख्या वाढीसाठी त्यांनी केलेल्या शैक्षणिक कामाबद्दल त्यांना जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत सहशिक्षक या पदावरती नियुक्ती देण्यात आली.या कार्याबद्दल त्यांना पंचायत समिती पंढरपूर यांच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला.
पेहे केंद्राचे केंद्र अध्यक्ष दशरथ मोरे,गगनगिरी विद्यालय सांगवी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल रणदिवे,शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुंडलिक भोसले,उपाध्यक्ष सोमनाथ गलांडे,ग्रामस्थांनी त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


























