पंढरपूर – जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना अधिकाधिक प्रेरणा मिळावी आणि आणखी जोमाने काम करण्याची उर्जा निर्माण करण्यासाठी प्रतिवर्षाप्णे विलंबाने का होईना शिक्षक शिक्षिका यांना २०२५-२६ वर्षांचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक ३३ आदर्श केंद्रप्रमुख १ आदर्श विस्ताराधिकारी १ विषय तज्ञ १ असा पुरस्कार वितरण सोहळा स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज येथील सभागृहात उत्साहात संपन्न झाला
सुरुवातीला प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता साहेब यांनी केले.आदरणीय आमदार अभिजित आबा पाटील,शिक्षकांच्या ह्रदयीस्थानी असलेले वसंतनाना देशमुख, जि.प.सदस्य आदिनाथ देशमुख,शण्मुखी कोरके,गितांजली साळुंखे,दुर्गाताई अंकुशराव, नंदकुमार वाघमारे,सभापती डॉ शुभम आगावणे ,उपसभापती प्रमोद देशमुख सर, सदस्य शहाजी मुळे, महादेव जाधव,सावली गायकवाड, ज्योती पांढरे, रंजना शिंदे,अक्का ताई लोखंडे,प्रियांका जाधव.गटविकास अधिकारी अमोल जाधव गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता,मा.बी.पी.रोंगे.मुकुंद पवार,आदींच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करून सुरुवात झाली.
सुरुवातीला पंढरी गीतमंच ज्ञानेश्वर दुधाणे यांचे संयोजनाने ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर करत कार्यक्रमाला सुरुवात झाली.उपस्थित सर्व मान्यवरांचे सत्कार स्वागत पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले.नंतर मान्यवरांच्या मनोगतात आदरणीय आमदार अभिजित पाटील, वसंतनाना देशमुख, आदीनाथ देशमुख,अमोल जाधव,आणि सभापती डॉ शुभम आगावणे उपसभापती प्रमोद देशमुख सर यांची मनोगत संपन्न झाली त्यामध्ये अभिजित आबा पाटील यांनी सांगितले की आई वडीलांनंतर समाज कोणाला जास्त मान देतो तर तो शिक्षकांना देतो.
समाजामध्ये अजून शिक्षकांविषयी आदर आहे.आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवायच्या असतील तर विद्यार्थी हा गुणवत्तापूर्ण आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व बनला पाहिजे.त्यासाठी तुम्ही त्यांचे आदर्श मार्गदर्शक बना,मुलींना आत्मनिर्भर बनवा सांगत सर्वांनी जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट वाढला पाहिजे, भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही निश्चितच सर्वजण मिळून काम करु सांगितले.त्यानंतर पंढरपूर तालुक्यातील ३६ शिक्षक शिक्षिका यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी गावडे सर आणि सरस्वती भालके मॅडम यांनीही मनोगतात मुलांसाठी करत असलेल्या कष्टाचा हा सन्मान असून यामुळे आणखी जोमाने काम करण्याची उर्जा या पुरस्काराने मिळाली असल्याचे सांगितले.या सुंदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शहाजी देशमुख आणि सविता दुधभाते यांनी करत आभार आण्णासाहेब पवार,यांनी मानले.
यावेळी पंढरपूर तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,सर्व शाळांमधील शिक्षक शिक्षिका बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करकंब बीट विस्ताराधिकारी दशरथ मोरे साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली पंचायत समिती मधील सर्व केंद्रप्रमुख, विशेष शिक्षक विषयतज्ञ, यांनी अधिक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.
















