मुदखेड – शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली नसल्याने अनेक नगर वस्तीत सार्वजनिक नळाचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांना दाहीदिशा भटकंतीची वेळ आली आहे . सत्ताधाऱ्यांनी गाजा वाजा करून नगरपरिषदे अंतर्गत टँकरची जलसेवा स्वखर्चातून सुरू केल्याचा उहापोह खोल ठरला आहे . यामुळे शहरातील नागरिकातुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे .
उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरातील अनेक वस्तीत पाणीटंचाईचा भिषण प्रश्न निर्माण झाला आहे . मुदखेड नगरपरिषद अंतर्गत शहरातील नागरिकांना कायमस्वरूपी शुद्ध पाणीपुरवठा मिळवायासाठी सन २०२१ मध्ये ४२ कोटीच्या योजनेस शासनाने मंजुरी दिली आहे . दोन वेळा मुदतवाढ देऊनही संबंधित कंत्राटदाराने अजूनही काम पूर्ण केलेले नाही . यामुळे शहरातील बहुतांश वस्तीमध्ये भीषण पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवला आहे . नगरपरिषदेच्या निवडणुका नुकत्याच पार पडले असेल या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे . यानंतर प्रलंबित पिण्याच्या पान्याचा प्रश्न लवकर निकाली काढला जाईल अशी अपेक्षा नागरिकांना होती . परंतु नगरपरिषदेत प्रभारी मुख्य अधिकाऱ्याकडे प्रभार असल्याने रामभरोसे कारभाराला नागरिक वैतागले आहे .
मुदखेड नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष विश्रांती माधव कदम यांनी शहरातील अनेक वस्तीतील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला . विशेष कार्यक्रमाचे अवचित्य साधून पाणीटंचाईची धाकता कमी करण्यासाठी नगरपरिषदेच्या टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम हाती घेतला . परंतु सामाजिक बांधिलकीतून जोपासलेला जलसेवेचा प्रश्न अजूनही कायमच आहे . याउलट नगरपरिषदेचे जलसेवेचे टँकर गुत्तेदाराच्या रस्त्याच्या पाणी वापर कामासाठी वापरले जात असल्याने नागरिकांनी खंत व्यक्त केली जात आहे . निवडणूक काळात शहरातील नागरिकांना भरघोश आश्वासनांची खैरात करण्यात आली होती . परंतु सत्ताधाऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न टँकरद्वारे सोडविता येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

















