सोलापूर – आयुष्यात चांगल्याला चांगलं म्हणून कौतुक करणारी माणसं भेटली की, त्या माणसांसाठी अख्खा आयुष्य देणारी समाजातली देव माणसं कोणत्याही प्रसंगी उपयोगी पडतात. म्हणून समाज चांगल्या माणसांची कदर करतो असे प्रतिपादन प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी वीरशैव सेवा मंडळ आयोजित मान्यवरांच्या सत्कार समारंभात केले.
सुरेश चिक्कळी यांची सोलापूर जनता सह.बँकेच्या संचालक पदी निवड व सौ. विद्याताई मणुरे यांची बेस्ट रोटरियन म्हणून निवड झाल्याबद्दल वीरशैव सेवा मंडळ पूर्व विभाग यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सुरेश चिक्कळी यांनी सामाजिक कार्यामुळे मिळणारे समाधान लाख मोलाचे असते. आणि जगण्याचे बळ देते. असा विश्वास व्यक्त केला.
बेस्ट रोटरीयन पद कसे प्राप्त होते. रोटरी ही सामाजिक कामाची प्रेरणा देणारी संघटना आहे. त्यामुळे गरज ओळखून मदत करता येते. असे मत सौ. विद्याताई मणुरे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीशैल शिल्ले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. शिवकर्णी पाटील यांनी केले.
कार्यक्रमास शिवशरण खैराटे, मनोहर तेलसंग, विश्वनाथ मेरकर, सूत्रेश स्वामी,शशिकांत विभुते,नंदगावकर,सौ भंडारी ताई,मंडळाचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.


















