सोलापूर – वडिलांनी तिघा मुलांना विष पाजून आत्महत्या केल्याची घटना बुधवार दिनांक 1 एप्रिल रोजी घडली आहे. भीमण्णा वाघमारे, वय 34, रा. तिर्हेगाव, ता. दक्षिण सोलापूर असे मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव आहे.
मयत भीम वाघमारे आणि पत्नी यांच्यामध्ये घरगुती कारणावरून वाद झाले होते. वाद झाल्याने पत्नी देगाव येथे माहेरी गेली होती. पत्नी आणि माझ्या मध्ये वाद झाल्याने पत्नी माहेरी गेली असल्याची माहिती भीम यांनी नातेवाईकांना दिली. नातेवाईकांनी देगाव येथे जाऊन भीम यांच्या पत्नीला समजविले असता पत्नीने सासरी येण्यास नकार दिला.
भीम याने पत्नीस फोन करून सासरी येण्यास आग्रह केला परंतु पत्नीने येण्यास नकार दिल्याने त्या नैराश्यातून तीन मुले जानवी भीम वाघमारे, प्रगती भीम वाघमारे आणि मुलगा बाबू भीम वाघमारे यांना वळसंग जवळच्या शेतात नेऊन विषारी औषध पाजून स्वतःही पिल्याने यात भीम वाघमारे यांचा मृत्यू झाला. यामध्ये तीनही मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे माहिती मिळत आहे. या घटनेची नोंद सिविल पोलीस चौकीत झाली असून याचा पुढील तपास वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.



















